इस्रायलच्या हेरांना युएईमध्ये प्रशिक्षण

इराणच्या संकेतस्थळाचा आरोप

israel uae flagsतेहरान – लेबेनीज नागरिक इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या जाळ्यात ओढले जात आहे. हे लेबेनीज नागरिक इस्रायलसाठी हेरगिरी करण्यासाठी तयार होत आहेत. विशेष म्हणजे मोसाद या हेरांना युएईमध्ये विशेष प्रशिक्षण देत असल्याचा गंभीर आरोप इराणच्या संकेतस्थळाने केला.

युएईबरोबरच्या सहकार्याचा फायदा घेऊन इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने या अरब देशात छुपे केंद्र सुरू केले आहे. मोसादसाठी एजंट म्हणून काम करण्यासाठी तयार होणाऱ्या लेबेनीज नागरिकांना त्वरीत युएईमध्ये आणले जाते. येथे मोसादच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांना 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. मोसादच्या देखरेखीखाली त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते व त्यानंतर या नव्या एजंट्सना लेबेनॉन किंवा इतर अरब देशांमध्ये मोहिमेसाठी रवाना केले जाते, असा दावा इराणच्या संकेतस्थळाने केला. इराणी संकेतस्थळाचा हा गंभीर आरोप इस्रायल व युएईने दुर्लक्षित केला आहे.

leave a reply