चीनच्या नौदलाकडे कुशल, प्रशिक्षित अधिकारीच नाहीत

- चीनच्या लष्करी मुखपत्राची कबुली

प्रशिक्षित अधिकारीबीजिंग – ‘चीनचे नौदल अतिप्रगत युद्धनौका आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होत आहे. पण युद्धनौका व शस्त्रास्त्रे हाताळण्यासाठी चीनच्या नौदलाकडे पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित व कुशल अधिकारीच नाहीत. सध्या चिनी युद्धनौका, विनाशिकांवर तैनात असलेल्या काही अधिकाऱ्यांनी नौदलासाठी आवश्यक असलेली प्रशिक्षण चाचणीच दिलेली नाही’, अशी जाहीर कबुली चीनच्या लष्करी मुखपत्राने दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात जगभरातील देश एकत्र येत असताना चिनी नौदलाबाबतची ही कबुली लक्षवेधी ठरते.

आर्थिक तसेच लष्करी आघाडीवर चीन लवकरच अमेरिकेला मागे टाकेल, असे दावे चिनी तसेच चीनच्या प्रभावाखाली असलेले विश्लेषक करीत आहेत. पण गेल्या वर्षभरात चीनच्या सामर्थ्याबाबत केले जाणारे दावे पोकळ असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेले हादरे आणि त्यामुळे या देशात निर्माण झालेले अराजक सोशल मीडियामार्फत जगासमोर यात आहे. तर आता चीनच्या लष्करी सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपसिस्थत करणाऱ्या बातम्या जगजाहीर होऊ लागल्या आहेत.

26 डिसेंबर रोजी ‘पिपल्स डेलि’ या चिनी लष्कराच्या मुखपत्राने लक्षवेधी बातमी प्रसिसद्ध केली. ‘इक्विपमेंट अवेटिंग टॅलेंट’ शीर्षक असलेल्या या बातमीत चीनच्या लष्करानचे आपल्या नौदलात असलेल्या उणीवा व कमतरतेचा पाढा वाचला. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या अत्याधुनिकीकरणाला वेग दिला असला तरी नौदलाच्या विनाशिका, त्यावरील शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कुशल अधिकारीच नसल्याचा दावा या मुखपत्राने केला आहे.

चिनी युद्धनौका व विनाशिकांचे नेतृत्व सांभाळणारे वॉईस कॅप्टन पदावरील अधिकारी देखील सदर पदासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत, असेही चिनी मुखपत्राने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नौदलातील जुन्या विनाशिकांना सेवेतून निवृत्त करून त्यांची जागा आधुनिक विनाशिकांनी घेतली. पण या आधुनिक विनाशिकांची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम, कुशल व प्रशिक्षित अधिकाऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याची कबुली पिपल्स डेलिने दिली. चीनच्या नौदलावरील हे संकट अधिकाधिक गंभीर बनत चालल्याचा इशारा या वर्तमानपत्राने दिला आहे.

कम्युनिस्ट राजवटीने लादलेली वन चाईल्ड पॉलिसी चीनच्या लष्करासाठी मारक ठरू लागली आहे. यामुळे सर्वस्व पणाला लावून लढण्याची वृत्ती चीनच्या संरक्षणदलांमध्ये विकसित होत नाही. चीनमधील तरुण विशेष कौशल्याशिवाय फक्त पैशासाठी लष्करात भरती होतात. त्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेसाठी समर्पणाची भावनाच नसते, अशी टीका विश्लेषक करीत आहेत. 2015 साली सुदानमध्ये शांतीमोहिमेचा भाग असणाऱ्या चिनी जवानांनी दहशतवाद्यांच्या विरोधातील संघर्षातून पळ काढल्याचे प्रकरण जगभरात गाजले होते, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. पण आता चीनच्या मुखपत्रांनीच ही टीका करून विश्लेषकांनी याआधी केलेले दावे खरे असल्याचे दाखवून दिले आहे.

सध्या चीनच्या नौदलात दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. पण त्यावरून लढाऊ विमानांचे उड्डाण करून ही विमाने पुन्हा युद्धनौकेवर उतरविण्याचे कौशल्य असलेले लढाऊ वैमानिक चीनकडे नाहीत, असा दावा काहीजणांनी याआधी केला होता.

हिंदी

leave a reply