चीन-रशिया-इराणच्या नौदलाचा ओमानच्या आखातात युद्धसराव

बीजिंग – बुधवारपासून ओमानच्या आखातात चीन, रशिया आणि इराणच्या नौदलाचा युद्धसराव सुरू झाला आहे. यामध्ये इतरही देशांचे नौदल सहभागी होणार असल्याची घोषणा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केली. अमेरिकेबरोबर तणाव असणाऱ्या देशांचा हा युद्धसराव असल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रातून व्यापारी वाहतूक करणाऱ्या अमेरिका व मित्रदेशांना चीनने इशारा दिल्याचे दिसत आहे.

चीन-रशिया-इराणच्या नौदलाचा ओमानच्या आखातात युद्धसराव‘सिक्युरिटी बॉन्ड-२०२३’ सागरी सरावात सहभागी होणाऱ्या देशांमधील सहकार्य यामुळे वाढेल. तसेच या क्षेत्रातील शांती व स्थैर्याला या सरावामुळे सकारात्मक उर्जा मिळेल, असा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. बुधवारपासून ओमानच्या आखातात सुरू झालेला हा सराव रविवारपर्यंत चालणार आहे. यामध्ये इतरही देशांचे नौदल सहभागी होणार असल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. या सागरी क्षेत्रात चीन, रशिया व इराणच्या नौदलाचा हा दुसरा युद्धसराव ठरतो. गेल्याच महिन्यात या तीनही देशांच्या नौदलाने या क्षेत्रात अभ्यास केला होता.

पर्शियन आखातातून मोठ्या प्रमाणात इंधनाची वाहतूक केली जाते. गेली काही वर्षे अमेरिका व युरोपिय देशांनी या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. पण अमेरिकेतील बायडेन प्रशासनाच्या भूमिकेमुळे चीन या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा अमेरिकी विश्लेषकच देत आहेत.

हिंदी

 

leave a reply