तैवानच्या राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी काँग्रेसच्या सभापतींच्या भेटीवर चीनची आगपाखड

- प्रत्युत्तरादाखल विमानवाहू युद्धनौका तैवान सागरी क्षेत्रात धाडली

वॉशिंग्टन/बीजिंग – तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी बुधवारी अमेरिकी संसदेचे सभापती केव्हिन मॅक्कार्थी यांची भेट घेतली. कॅलिफोर्नियातील रोनाल्ड रिगन प्रेसिडेन्शिअल लायब्ररीमध्ये पार पडलेल्या या भेटीदरम्यान रिपब्लिकन तसेच डेमोक्रॅट पक्षाचे अनेक संसद सदस्यही उपस्थित होते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने दिलेल्या इशाऱ्यांनंतरही ही भेट झाल्याने चीनने जोरदार आगपाखड सुरू केली आहे.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी काँग्रेसच्या सभापतींच्या भेटीवर चीनची आगपाखड - प्रत्युत्तरादाखल विमानवाहू युद्धनौका तैवान सागरी क्षेत्रात धाडलीतैवानचा मुद्दा हा अमेरिका-चीन संबंधांमधील ‘फर्स्ट रेड लाईन’ असल्याचे बजावत पुढील काळात अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे टीकास्त्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोडले. त्याचवेळी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवानच्या सागरी क्षेत्रात व्यापक युद्धसराव सुरू केला असून यासाठी ‘शान्डाँग’ ही विमानवाहू युद्धनौकाही तैनात केली आहे.

गेल्याच महिन्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन अमेरिका खंडाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली होती. या दौऱ्यात त्या अमेरिकेला भेट देतील, असेही संकेत देण्यात आले होते. त्साई इंग-वेन यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकी काँग्रेसचे सभापती केव्हिन मॅक्कार्थी यांनी जाहीर केले होते. त्यावर चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी काँग्रेसच्या सभापतींच्या भेटीवर चीनची आगपाखड - प्रत्युत्तरादाखल विमानवाहू युद्धनौका तैवान सागरी क्षेत्रात धाडलीअमेरिकेला इशारे देणाऱ्या चीनने तैवानवरही दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

मात्र चीनच्या दबावतंत्र व धमक्यांकडे दुर्लक्ष करीत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी बुधवारी कॅलिफोर्निया प्रांतातील कार्यक्रमात अमेरिकी काँग्रेसचे सभापती व रिपब्लिकन पक्षाचे नेते मॅक्कार्थी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या भाषणात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी, लोकशाही व शांतता धोक्यात असल्याचा इशारा दिला. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी काँग्रेसच्या सभापतींच्या भेटीवर चीनची आगपाखड - प्रत्युत्तरादाखल विमानवाहू युद्धनौका तैवान सागरी क्षेत्रात धाडलीअमेरिकी काँग्रेसचे सभापती मॅक्कार्थी यांनीही त्याला दुजोरा देत स्वातंत्र्य, शांतता व क्षेत्रिय स्थैर्य टिकविणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्याचवेळी अमेरिकेकडून तैवानच्या सुरक्षेसाठी होणारा शस्त्रपुरवठा थांबणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

इंग-वेन व मॅक्कार्थी यांच्या भेटीवर चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘अमेरिकेच्या भूमीवर झालेल्या उच्चस्तरीय भेटीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेने चीनचे सार्वभौमत्त्व व एकात्मतेचे उल्लंघन झाले आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी काँग्रेसच्या सभापतींच्या भेटीवर चीनची आगपाखड - प्रत्युत्तरादाखल विमानवाहू युद्धनौका तैवान सागरी क्षेत्रात धाडलीत्याचवेळी तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विघटनवादी शक्तींना चुकीचा संदेश गेला आहे. अमेरिका व तैवानने केलेल्या या गंभीर चुकीला चीनकडून कठोर व तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.

अमेरिका-चीनमधील संबंधांसाठी ही ‘फर्स्ट रेड लाईन’ असल्याची जाणीव अमेरिकेने ठेवावी, असे चीनने बजावले आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’नेही अमेरिका-तैवानमधील उच्चस्तरीय भेटीवर प्रत्युत्तर दिले आहे. तैवानच्या सागरी क्षेत्रात व्यापक युद्धसराव सुरू करण्यात आला आहे. या युद्धसरावासाठी चीनची ‘शान्डाँग’ ही विमानवाहू युद्धनौका व ‘कॅरिअर ग्रुप’ तसेच लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.

leave a reply