‘अल-कायदा’च्या ‘एक्यूआयएस’कडून भारतात हल्ल्याची चिथावणी

नवी दिल्ली – अल-कायदाची ‘एक्यूआयएस’ ही संघटना भारतात ‘लोन वुल्फ’ हल्ल्याच्या तयारीत आहे, अशी माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. यासाठी इंटरनेटवर विखारी प्रचार करणारे व्हिडीओ ‘एक्यूआयएस’कडून प्रसिद्ध केले जात असून याद्वारे भारतात हल्ल्यासाठी चिथविले जात आहे. हे विषारी व्हिडिओ तयार करण्याकरिता बांगलादेशमधील काही जणांची मदत घेतली जात असल्याचा दावा गुप्तचर संघटनांनी केला आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अर्लटवर आहेत.

Al-Quaida‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटल’ (एक्यूआयएस) या संघटनेने बागलादेशमधील काही जणांच्या मदतीने भारतात ‘लोन वुल्फ’ हल्ल्यांचा कट आखला असून सुरक्षादलांना आणि नेत्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी माहिती गुप्तचर संघटनांच्या हाती लागली आहे. एक्यूआयएसने तरुणाची माथी भडकविणाऱ्या आणि ‘लोन वुल्फ’ हल्ल्यांसाठी चिथावणी देणाऱ्या या व्हिडिओंची मालिकाच इंटरनेटवर लोड झाली असून ते मोठया प्रमाणावर शेअर केले जात आहेत. या चिथावणी देणाऱ्या प्रचारकी व्हिडीओंवर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेऊन आहेत.

२०१४ साली अल कायदा प्रमुख अयमन अल जवाहिरीने भारतीय उपखंडात हल्ल्यासाठी ‘ एक्यूआयएस’ची स्थापना केली होती. मात्र या संघटनेला भारत आणि उपखंडात आपला कोणताही हल्ल्याचा कट तडीस नेता आलेला नाही. त्यामुळे ही संघटना सध्या कमकुवत बनली आहे. या संघटनेकडून याआधीही भारतात हल्ल्याची चिथावणी देण्यात आली होती. मात्र यावेळी या संघटनेकडून अनेक व्हिडीओ टाकण्यात आले असून भारतातही ते पाहिले जात आहेत. तसेच बांग्लादेशमध्ये काही कट्टरतावाद्यांचा संबंध याच्याशी जोडला गेल्याने गुप्तचर यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत.

leave a reply