लागोस – पश्चिम आफ्रिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या बोको हराम या दहशतवादी संघटनेविरोधात नायजरमध्ये केलेल्या कारवाईत 30 दहशतवाद्यांना ठार केले. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी संघर्षबंदी करून शरण यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला दहशतवाद्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ही कारवाई केल्याचे लष्कराने म्हटले आहे.
नायजर, नायजेरिया, कॅमेरुन आणि चाड या चार पश्चिम आफ्रिकी देशांच्या संयुक्त सीमेवरील ‘लेक चाड’ हा भाग गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटनांसाठी आश्रयस्थान बनले आहे. बोको हराम तसेच पश्चिम आफ्रिकेतील ‘इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स-आयएसडब्ल्यूएपी’ या आयएससंलग्न संघटनेच्या दहशतवाद्यांनी या भागात तळ ठोकला आहे. दशकभरापूर्वी बोको हराम ही संघटनाच या भागात प्रभावी होती. पण इराक-सिरियामध्ये आयएसचा प्रभाव वाढल्यानंतर 2016 साली ‘आयएसडब्ल्यूएपी’ बोको हरामपासून वेगळी झाली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये बोको हरामपेक्षा ‘आयएसडब्ल्यूएपी’ने पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली. तर बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या कारवाया नायजर व नायजेरियापर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत. या दोन्ही दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठी नायजर, नायजेरिया, कॅमेरुन आणि चाड या चारही देशांनी ‘मल्टिनॅशनल जॉईंट टास्क फोर्स-एमएनजेटीएफ’ हा बहुपक्षीय लष्करी गट उभारला होता. 8500 जवानांचा समावेश असलेल्या या गटाने सीमेवरील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई सुरू ठेवली आहे.
गेल्या आठवड्यात बोको हरामचे दहशतवादी मोठ्या संख्येने नायजेरियाच्या वायव्येकडील सांबिसा जंगलातून पलायन करीत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर बहुपक्षीय लष्कराने बोको हरामच्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. पण त्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळल्यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत 30 दहशतवादी ठार झाले. कामादुगू योबे नदीच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली.
यावेळी दहशतवाद्यांच्या 960 समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर या दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या किमान 960 जणांना ताब्यात घेतल्याचे लष्करी सूत्रांनी जाहीर केले. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याला काही तास उलटत नाही तोच, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी नायजरचा दौरा केला. यावेळी बहुपक्षीय लष्करी गटाने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईचे ब्लिंकन यांनी स्वागत केले. तसेच साहेल देशांमधील संघर्षात विस्थापित झालेल्यांसाठी 15 कोटी डॉलर्सचे सहाय्य जाहीर केले.
आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात सोमवारी सोन्याचे व्यवहार प्रति औंस १,८७९ डॉलर्सने सुरू झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकी बाजारपेठेत सोन्याचे व्यवहार प्रति औंस १,९८८.११ डॉलर्सवर बंद झाले. एप्रिल २०२२नंतर सोन्याच्या दरांनी नोंदविलेली ही उच्चांकी पातळी ठरली आहे. अमेरिका व युरोपातील बँकिंग क्षेत्रातील संकट लवकर निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्यावरील भर कायम ठेवतील व लवकरच सोने दोन हजार डॉलर्सचा टप्पा पार करील, असा दावा ‘किटको’ या वेबसाईटने केला आहे. अमेरिका तसेच आशियातील तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याने २,०७० डॉलर्स प्रति औंसची विक्रमी पातळी गाठली होती.
हिंदी