आखातातील चीनच्या घुसखोरीपासून अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका

- अमेरिकेच्या सेंटॅकॉम प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘चीन अतिशय आक्रमकतेने आखातातील आपले राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक अतिक्रमण वाढवित आहे. या क्षेत्रातील चीनची पूर्ण घुसखोरी रोखायची असेल तर अमेरिकेने आपल्या आखाती मित्रदेशांबरोबरील लष्करी सहकार्याचा वेग वाढविला पाहिजे. अन्यथा अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण होईल. चीनबरोबरच इराणचा धोका देखील वाढत चालला आहे’, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख जनरल मायकल एरिक कुरिला यांनी दिला. इस्रायल व अरब देशांमधील अब्राहम कराराचा विस्तार चीनचा आखातातील प्रभाव रोखू शकतो, याकडेही जनरल कुरिला यांनी लक्ष वेधले.

आखातातील चीनच्या घुसखोरीपासून अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका - अमेरिकेच्या सेंटॅकॉम प्रमुखांचा इशाराआठवड्याभरापूर्वी चीनने इराण व सौदी अरेबियामध्ये केलेल्या ‘डिल’चे बायडेन प्रशासनाने स्वागत केले आहे. पण अमेरिकन सिनेट व लष्करी अधिकाऱ्यांकडून यावर चिंता व्यक्त केली जात आहे. चीनची आखातातील ही घुसखोरी अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकते, असा संदेश अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड्‌‍ सर्व्हिसेस कमिटी’च्या बैठकीतून सलग दोन दिवस दिला जात आहे. आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख जनरल कुरिला यांनी देखील चीनचा धोका अधोरेखित केला.

अमेरिकेची आखातातील गुंतवणूक, सहकार्य आणि हितसंबंधांना चीन स्पर्धा देत आहे, याकडे जनरल कुरिला यांनी लक्ष वेधले. चीन अतिशय आक्रमकतेने आणि हेतूपुरस्सर आखातातील आपले राजनैतिक, लष्करी, आर्थिक व माहितीचे जाळे विस्तारीत असल्याची जाणीव सेंटकॉमच्या प्रमुखांनी करुन दिली. यासाठी अमेरिकेकडून आखाती देशांना लष्करी सहाय्य पुरविण्यातील दिरंगाई जबाबदार असल्याचा ठपका जनरल कुरिला यांनी ठेवला. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर अमेरिकेची शस्त्रास्त्रे चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांपेक्षा नक्कीच सरस असल्याचे जनरल कुरिला यांनी ठासून सांगितले.

मात्र, इतर आघाडीवर चीन अमेरिकेला मात देत असल्याचे सेंटकॉमचे प्रमुख म्हणाले. आखातातील चीनच्या घुसखोरीपासून अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका - अमेरिकेच्या सेंटॅकॉम प्रमुखांचा इशाराअमेरिकेच्या प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्या, काँग्रेसमधील सुनावणी आणि खासगी कंपन्यांकडून पारित झाल्यानंतर आखाती देशांना लष्करी सहाय्य पुरविले जाते. याउलट चीनकडून आखाती देशांना लष्करी सहाय्य पुरविताना कुठलाही अडथळआ येत नाही, असा दावा जनरल कुरिला यांनी केला. गेल्या दहा वर्षात चीनची आखातातील शस्त्रविक्री ८० टक्क्यांनी वाढली तर याच काळात अमेरिकेची शस्त्रविक्री ३० टक्क्यांनी घसरल्याचे जनरल कुरिला यांनी निदर्शनास आणून दिले.

इराण-सौदीमधील डिलनंतर चीनची आखाती देशांमधील घुसखोरी वाढू शकते. त्याआधीच अमेरिकन काँग्रेसने आपल्या धोरणात बदल करावे, असे सेंटकॉमच्या प्रमुखांनी सुचविले. आखाती मित्रदेशांबरोबरच्या लष्करी सहकार्याचा वेग वाढविला तर चीनला रोखणे सोपे जाईल. अन्यथा इस्रायल व आखाती देशांमधील अब्राहम कराराद्वारे आखाती देशांना हवाई आणि क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेने जोडण्याच्या योजनांना देखील तडा जाईल. त्याआधी अब्राहम कराराचा विस्तार केल्यास चीनचा प्रभाव रोखता येईल, असे सेंटकॉमच्या प्रमुखांनी सुचविले.

दरम्यान, इराण-सौदीमधील डिलमुळे आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांबरोबरच इस्रायल-अरब देशांमधील अब्राहम कराराला देखील धोका निर्माण झाल्याचा इशारा अमेरिकेतील लष्करी अधिकारी व विश्लेषक गेल्या काही दिवसांपासून देत आहेत. या डिलमुळे इराण अधिकच बेधडक बनेल, असे अमेरिकी विश्लेषक बजावत आहेत.

हिंदी

 

leave a reply