चीनने तैवानवर आक्रमण केलेच तर अमेरिका युक्रेनपेक्षा वेगळी भूमिका स्वीकारील

- पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याचा दावा

चीनने तैवानवरवॉशिंग्टन – गेल्या १७ दिवसांपासून युके्रन रशियाच्या घणाघाती हल्ल्यांचा सामना करीत आहे. पण अमेरिका युक्रेनला अपेक्षित सहकार्य करायला तयार नाही. बायडेन प्रशासनाचा हा नाकर्तेपणा लक्षात घेऊन चीन रशियाचे अनुकरण करून तैवानवर हल्ला चढविल, असे इशारे अमेरिकन नेते तसेच लष्करी विश्‍लेषक देत आहेत. पण युक्रेनमधील संघर्षातून अमेरिकेने मोठी शिकवण घेतल्याचा दावा पेंटॅगॉन करीत आहे. त्यामुळे येत्या काळात चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर यावरील अमेरिकेची भूमिका युक्रेनपेक्षा वेगळी असेल, असे आश्‍वासन पेंटॅगॉनने दिले आहे.

गेल्या महिन्यात रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर चीन तैवानला लक्ष्य करेल, अशी जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. चीनने युक्रेनच्या मुद्यावर रशियाला समर्थन दिले असून रशियानेही तैवान प्रकरणात चीनला पाठिंबा दिला होता. चीन रशियाचे अनुकरण करून तैवानविरोधात कारवाईचे पाऊल उचलेल, असे दावे तैवानमधूनच झाले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवान चीनचा अविभाज्य भाग असून त्याची तुलना युक्रेनशी करता येणार नसल्याचे बजावले होते. पण त्याचबरोबर चीन आपल्या अखंडतेशी तडजोड करणार नसल्याचे सांगून चीनने तैवानबाबत अमेरिका व मित्रदेशांना इशारा दिला होता. बायडेन प्रशासनाने तैवानसाठी लष्करी सहाय्याची घोषणा करून चीनच्या इशार्‍याला उत्तर दिले होते.

चीनने तैवानवरपण येत्या काळात चीनने तैवानवर हल्ला चढविला तर अमेरिका युक्रेनप्रमाणे तैवानलाही लष्करी सहाय्य करणार नाही, अशी चिंता काही विश्‍लेषकांनी वर्तविली होती. पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनच्या इंडो-पॅसिफिक विभागाचे उपमंत्री एली रॅट्नर यांनी युक्रेनमधील संघर्षातून बायडेन प्रशासनाने मोठा धडा घेतल्याचे सिनेटच्या आर्मड् सर्व्हिसेस समितीसमोर म्हटले आहे.

चीनच्या वाढत असलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र पेंटॅगॉनसाठी प्राधान्यक्रमावर असल्याचे रॅट्नर म्हणाले. तैवानबाबत बोलताना, चीनच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी अमेरिका तैवानला शस्त्रसज्ज करण्यासाठी आणि तैवानची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सहाय्य करील, असे आश्‍वासन रॅट्नर यांनी दिले आहे.

leave a reply