बायडेन-जिनपिंग चर्चेआधी चीनच्या विमानवाहू युद्धनौकेची तैवानच्या आखाताजवळून गस्त

तैवानच्या आखाताजवळून गस्तबीजिंग – चीनच्या ‘शँदॉंग’ या विमानवाहू युद्धनौकेने शुक्रवारी तैवानच्या आखाताजवळून गस्त घातली. तर त्याआधी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात युक्रेनबाबत चर्चा सुरू होण्याआधी चीनने ही कारवाई केली. या चर्चेत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना तैवानप्रकरणी इशारा दिल्याच्या बातम्या येत आहेत. त्याआधी चीनच्या युद्धनौकेने तैवानच्या आखाताजवळून प्रवास करून बायडेन प्रशासनाला नवा इशारा दिल्याचा दावा केला जातो.

तैवानच्या आखाताजवळून गस्तशुक्रवारी बायडेन आणि जिनपिंग यांच्यात व्हिडिओ कॉन्फरसन्सद्वारे चर्चा झाली. युक्रेन युद्धाप्रकरणी रशियाची साथ देणार्‍या चीनने परिणामांसाठी तयार रहावे, असे बायडेन यांनी इशारा दिल्याचे व्हाईट हाऊसचे म्हटले आहे. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी देखील व्यापार आणि तैवान या दोन मुद्यावरुन बायडेन प्रशासनाला धमकावल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बायडेन प्रशासनाने तैवानचा प्रश्‍न योग्यरित्या हाताळला नाही तर त्याचा थेट परिणाम अमेरिका-चीन संबंधावर होईल, असे जिनपिंग यांनी तैवानच्या आखाताजवळून गस्तबजावल्याचे चिनी माध्यमांचे म्हणणे आहे.

या चर्चेआधी चीनच्या शँदॉंग या विमानवाहू युद्धनौकेने तैवानच्या आखाताजवळून गस्त घातली. अमेरिकेच्या ‘युएसएस राल्फ जॉन्सन’ या विनाशिकेने चीनच्या युद्धनौकेचा पाठलाग केल्याचा दावा केल्याचे सूत्रांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. चीनच्या युद्धनौकेचे ड्रोनमधून काढलेले फोटोग्राफ्स समोर आले आहेत. लष्करी वेळापत्रकनुसार आपल्या युद्धनौकेने ही गस्त पूर्ण केली असून त्याचा बायडेन-जिनपिंग चर्चेशी संबंध नसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. पण तैवानच्या आखाताजवळून युद्धनौका रवाना करून चीन बायडेन प्रशासनावरील दडपण वाढवित असल्याचा दावा केला जातो.

leave a reply