इराकमध्ये पुढच्या वर्षी गृहयुद्ध भडकू शकते

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावा

अम्मान – इराकमधील सार्वत्रिक निवडणुकीला दोन महिने लोटले तरी अजूनही या देशात सरकार स्थापन झालेले नाही. इराणसमर्थक गटांकडून सुरू असलेली निदर्शने इराकमधील सरकार स्थापनेच्या आड येत आहेत. तर अमेरिका आणि अरब आखाती देश देखील इराकमधील आपला प्रभाव वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात इराकवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू होईल व यानंतर इराकमध्ये गृहयुद्ध पेट घेईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

इराकमध्ये पुढच्या वर्षी गृहयुद्ध भडकू शकते - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावाऑक्टोबर महिन्यात इराकमध्ये पार पडलेल्या निवडणूकीत मुक्तदा अल-सद्र यांचा पक्ष सर्वाधिक ७३ जागांवर निवडणून आला. असे असले तरी, इराकमध्ये सरकार स्थापनेसाठी सद्र यांना इतर पक्षांचे सहकार्य घ्यावे लागणार असून यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. इराकचे हंगामी पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी तसेच अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने इराकमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालांचे स्वागत केले होते.

पण कधीकाळी इराणशी संलग्न असलेल्या सद्र यांच्या या विजयाला इराण विरोध करीत आहे. इराकमध्ये पुढच्या वर्षी गृहयुद्ध भडकू शकते - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावाइराकमधील इराणसंलग्न गटांनी सद्र यांचा विजय बेकायदेशीर ठरवून फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. त्याचबरोबर इराणसमर्थक गटांनी गेल्या दोन महिन्यांपासून इराकमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू केली आहेत.

मुक्तदा अल-सद्र यांच्या भूमिकेत झालेला बदल याचे मुख्य कारण मानले जाते. इराकमध्ये अमेरिका किंवा इराणच्या प्रभावापासून मुक्त सरकार सत्तेवर असावे, अशी भूमिका सद्र यांनी गेल्या काही वर्षांपासून स्वीकारली आहे. अमेरिकी लष्कराने इराकमधून माघार घ्यावी, या आपल्या मागणीवर सद्र ठाम आहेत. पण त्याचबरोबर इराकच्या राजकारणावर इराणचा प्रभाव असू नये, अशी घोषणा सद्र यांनी केली आहे.इराकमध्ये पुढच्या वर्षी गृहयुद्ध भडकू शकते - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावा

याशिवाय मुक्तदा अल-सद्र सत्तास्थापनेनंतर अल-कधीमी यांना पंतप्रधानपदावर कायम ठेवू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी सद्र यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. असे झाल्यास इराकमधील आपला प्रभाव संपुष्टात येईल, अशी चिंता इराणचा सतावित आहे. त्यामुळे इराकवरील पकड सुटू नये म्हणून एकाचवेळी इराण, अमेरिका व अरब आखाती देशांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यातील संघर्षामुळे इराकमध्ये गृहयुद्ध पेट घेऊ शकते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply