अफगाण सीमेजवळ तालिबान व इराणच्या जवानांमध्ये संघर्ष

इराणच्या जवानांमध्येकाबुल/तेहरान – अफगाणिस्तानच्या निमरूझ प्रांताच्या सीमेवर तालिबान आणि इराणच्या जवानांमध्ये पुन्हा संघर्ष भडकला. गेल्या दीड महिन्यात अफगाण सीमेवर नवा संघर्ष पेटला आहे. तालिबानच्या नेतृत्वाने सीमेवरील वाढत्या तणावाबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

अफगाणिस्तानचा निमरूझ आणि इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांताच्या सीमेवर कायमस्वरुपी तणावाची परिस्थिती आहे. या सीमाभागातून अवैध वाहतूक तसेच तस्करी होत असल्याचा आरोप दोन्ही गटाच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो. तसेच दोन्ही देशांच्या यंत्रणांनी सीमेपलिकडील दहशतवादासाठी देखील एकमेकांवर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर, निमरूझ सीमेवर दोन्ही बाजूने गोळीबाराच्या घटना सुरू असतात.

दोन दिवसांपूर्वीही तालिबान आणि इराणच्या जवानांमध्ये संघर्ष पेटला. सीमेवरील या गोळीबाराचा व्हिडिओही समोरआला होता. काही तासानंतर तालिबान आणि इराणच्या जवानांनी चर्चा करून संघर्ष थांबविला. गैरसमजूतीमुळे हा संघर्ष भडकल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत.

जून महिन्यात अफगाण-इराण सीमेवर तीन वेळा संघर्ष भडकला होता. तालिबान तसेच इराणचे जवान यात मारले गेले होते. यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पडली होती.

leave a reply