रशिया-जर्मनीमधील इंधनवाहिनीत सहभाग असणार्‍या सर्व कंपन्यांनी बाहेर पडावे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा इशारा

वॉशिंग्टन/बर्लिन – ‘नॉर्ड स्ट्रीम २ इंधनवाहिनी प्रकल्पात सहभागी असणार्‍या सर्व कंपन्यांवर अमेरिका निर्बंध लादू शकते. त्यामुळे या कंपन्यांनी तात्काळ या प्रकल्पातील आपला सहभाग काढून घ्यावा’, असा खरमरीत इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाकडून सदर इंधनवाहिनी प्रकल्पाविरोधात अतिरिक्त निर्बंध लादण्याची तयारी सुरू असून त्यात प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी असणार्‍या ‘नॉर्ड स्ट्रीम २ एजी’चा समावेश असेल, असे संकेत देण्यात आले आहेत.

युक्रेनबरोबर दशकानुदशके सुरू असणारे वाद आणि २०१४ साली झालेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने युरोपिय देशांना करण्यात येणार्‍या इंधनपुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यात ‘नॉर्ड स्ट्रीम’ हा महत्त्वाचा भाग असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यरत झाला आहे. याची क्षमता ५५ अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविण्याची आहे.

‘नॉर्ड स्ट्रीम २’च्या माध्यमातून ही क्षमता ११० अब्ज घनमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे. यासाठी रशिया व जर्मनीत करारही झाला असून दोन्ही देशांनी प्रकल्प पुढे नेण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी ११ अब्ज डॉलर्स खर्च येत असून त्याचा अंतिम टप्पा सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिकेने या प्रकल्पाच्या मुद्यावरून जर्मनीवर जबरदस्त दडपण आणले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रकल्पात सामील असणार्‍या युरोपिय तसेच रशियन कंपन्यांवर निर्बंधही लादले होते. हेच धोरण यापुढेही कायम राहिल व इंधनप्रकल्प पूर्ण होण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्व पर्यायांचा वापर करु, असे बायडेन प्रशासनाकड

leave a reply