युक्रेनसह पाश्चिमात्य देशांविरोधातील सायबरयुद्ध प्राणघातक ठरु शकते

- रशियन हॅकर्सचा इशारा

मॉस्को/किव्ह – रशियन हॅकर्स आणि युक्रेन व समर्थक देशांमध्ये सुरू असलेले सायबरयुद्ध प्राणघातक ठरु शकते, असा इशारा रशियन हॅकर्सनी दिला. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच दोन देशांमध्ये सायबरहल्ल्यांना तोंड फुटले होते. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा हॅकर्सचा गट असणाऱ्या ‘ॲनोनिमस’ने युक्रेनला समर्थन देऊन रशियावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रशिया व पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या सायबरयुद्धाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर, रशियन हॅकर्सनी दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

युक्रेनसह पाश्चिमात्य देशांविरोधातील सायबरयुद्ध प्राणघातक ठरु शकते - रशियन हॅकर्सचा इशारारशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी रशियन हॅकर्सनी युक्रेनच्या यंत्रणांवर मोठे हल्ले चढवून खळबळ उडविली होती. त्यानंतर युक्रेनने पाश्चिमात्य देशांसह जगभरातील हॅकर्सना रशियाविरोधातील सायबरहल्ल्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन युरोप तसेच अमेरिकेतील अनेक हॅकर्सनी रशियाविरोधात सायबरहल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. हॅकर्सचा सर्वात मोठा गट असणाऱ्या ‘ॲनोनिमस’ने रशियाविरोधात सायबरयुद्धाची घोषणा केली होती.

रशियन हॅकर्सचा गट असणाऱ्या ‘किलनेट’ने ‘ॲनोनिमस’च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले होते. काही दिवसांपूर्वी रशियन हॅकर्सनी अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांसह अनेक यंत्रणांना लक्ष्य केल्याचेही समोर आले होते. युक्रेनसह पाश्चिमात्य देशांविरोधातील सायबरयुद्ध प्राणघातक ठरु शकते - रशियन हॅकर्सचा इशारायात ‘लॉकहिड मार्टिन’ या कंपनीसह ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम’चा समावेश होता. मात्र रशियन हॅकर्सच्या नव्या इशाऱ्यामुळे सायबरयुद्ध नव्या टप्प्यावर जाण्याचे संकेत मिळत आहेत.

रशियन गट किलनेटच्या प्रमुखाने दिलेल्या इशाऱ्यात आपण अमेरिका तसेच युरोपिय यंत्रणांवर मोठे हल्ले चढविणार असून त्यात अनेकांचे बळी जाऊ शकतात, असे बजावले आहे. रशियासमर्थक व युक्रेनसमर्थक हॅकर्स प्रत्यक्षात समोरासमोर आले तर रशियन हॅकर्स युक्रेनी हॅकर्सची हत्या करतील, असा इशाराही किलनेटच्या प्रमुखांनी दिला.

दरम्यान, युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच युरोप व अमेरिकेचा दौरा करून पाश्चिमात्य सायबरसुरक्षा तज्ज्ञ तसेच हॅकर्सची भेट घेतल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply