सागरी पर्वताला धडक दिल्याने अमेरिकी पाणबुडीचे नुकसान

वॉशिंग्टन – गेल्या महिन्यात साऊथ चायना सीच्या क्षेत्रात अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीला झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ‘‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय समुद्रातून प्रवास करताना ‘युएसएस कनेक्टिकट’ पाणबुडी नकाशात नसलेल्या सागरी पर्वताला धडकून नुकसान झाले’’, असे अमेरिकेच्या नौदलाने जाहीर केले.

सागरी पर्वताला धडक दिल्याने अमेरिकी पाणबुडीचे नुकसान२ ऑक्टोबर रोजी अमेरिकन पाणबुडी साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास करताना हा अपघात झाला होता. यानंतर सदर पाणबुडी सहाय्यक जहाजांद्वारे दुरूस्तीसाठी गुआम बेटावर नेण्यात आली होती. आठवडाभर अमेरिकेच्या नौदलाने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

पण या घटनेनंतर चीनची चलबिचल वाढली होती. अमेरिकन पाणबुडीने दुसर्‍या विनाशिकेला किंवा पाणबुडीला धडक तर दिली नाही ना? असे प्रश्‍न चिनी माध्यमांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. अमेरिका काही तरी लपवित असल्याचा आरोपही चिनी माध्यमांनी केला होता.

सोमवारी अमेरिकेच्या नौदलाने यावर माहिती देताना, साऊथ चायना सीच्या क्षेत्रात नकाशात नसलेले सागरी पर्वत इथे असल्याचे सांगून या अपघाताची माहिती दिली.

leave a reply