
‘कोविड-१९’ अर्थात कोरोनाव्हायरसवरून जगभरात चीनवर टीका होत आहे. . यातून आपली प्रतिमा सावरण्याचा चीन आटोकाट प्रयत्न करीत आहे. चीनच्या वुहान येथील सिक्रेट प्रयोगशाळातून हा विषाणू बाहेर पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चीनचा हा सारा आटापिटा सुरु आहे.
या विषाणूचा उल्लेख ‘चिनी व्हायरस’ असा करू नका, असे चीन जगला सांगत आहे. चीनने राजनैतिक पातळीवर मोहीम सुरु केली असून विविध देशांच्या यी सरकारांशी संपर्क साधून या विषाणूला ‘चिनी व्हायरस’ संबोधण्यात येऊ नये यासाठी मनधरणी करीत आहे.वुहान येथून या साथीचा सर्वात आधी उल्लेख झाला असला तरी याचा जन्म येथूनच झाल्याचा कोणताही पुरावा नाही. एखाद्या विषाणूला एका देशाशी जोडणे चुकीचे ठरते , असे चीनचे म्हणणे आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री व्यांग यी यांनी या संदर्भात भारताच्या परराष्ट् रमंत्र्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी कोरोनाव्हायरससाठी ‘चिनी व्हायरस’ हा शब्दप्रयोग करू नका असे आवाहन केले. या विषाणूंवर चीनचा शिक्का मारून चीनची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत आहे.हा प्रयत्न अंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीसुद्धा धोकादायक ठरतो . भारत या संकुचित मानसिकतेचा विरोध करील अशी अपेक्षा, चीनचे परराष्ट्रमंत्री यी यांनी व्यक्त केली.
‘कोविड-१९’ विरोधातील लढाईत भारत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चीन आपले अनुभवाचा आधारे भारताला सहकार्य करण्यास तयार असल्याचे व्यांग यी म्हणाले.