कॉंगोमधील आत्मघाती हल्ल्यात आठ जणांचा बळी

बेनी – शनिवारी संध्याकाळी ‘डी आर कॉंगो’ची राजधानी बेनीमध्ये दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात आठ जणांचा बळी गेला. नाताळचा सण साजरा करण्यासाठी स्थानिक जमलेले असताना हा स्फोट झाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण कॉंगोमध्ये दहशत माजविणार्‍या ‘एडीएफ’ तसेच आयएस संलग्न दहशतवादी संघटनेवर संशय व्यक्त केला जातो.

कॉंगोमधील आत्मघाती हल्ल्यात आठ जणांचा बळीडेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (डी आर कॉंगो) किंवा कॉंगो या नावाने ओळखला जाणारा मध्य आफ्रिकेतील या देशात ख्रिस्तधर्मिय बहुसंख्य आहेत. कॉंगो खनिजसंपत्तीसाठी ओळखला जात असला तरी जवळपास गेली सात दशके या देश संघर्षामध्ये होरपळत आहे. कॉंगोमधील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, २०१८ साली सहा लाखांहून अधिक जणांना शेजारी देशांमध्ये धाव घेतली होती. तर साडेचार लाख जण विस्थापित झाले होते.

कॉंगोमधील आत्मघाती हल्ल्यात आठ जणांचा बळी‘अलायड् डेमोक्रॅटिक फोर्सेस-एडीएफ’ ही दहशतवादी संघटना कॉंगोमधील संघर्षासाठी कारणीभूत मानली जाते. एडीएफच्या दहशतवाद्यांनी २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांवरही हल्ले चढविले होते. तर इराक-सिरियामध्ये आयएस या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्यापासून कॉंगोमध्येही दहशतवाद व कट्टरपंथियांची ताकद वाढल्याची चिंता व्यक्त केली जाते. शनिवारी झालेल्या आत्मघाती स्फोटासाठी देखील आयएसचे दहशतवादी जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply