इंधनक्षेत्रातील गुंतवणुकीत झालेली घट हे जागतिक ऊर्जा संकटाचे मूळ

- जगातील आघाडीची इंधनकंपनी ‘ॲराम्को’च्या प्रमुखांचा दावा

इंधनक्षेत्रातीलबर्न – सध्या उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटासाठी युक्रेनमधील संघर्ष कारणीभूत नाही, तर इंधनक्षेत्रातील घटलेली गुंतवणूक तसेच अपुरे पर्याय व बॅकअप प्लॅन तयार नसणे ही प्रमुख कारणे आहेत, असा ठपका जगातील आघाडीची इंधनकंपनी ‘ॲराम्को’च्या प्रमुखांनी ठेवला. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘श्लुम्बर्गर डिजिटल फोरम २०२२’मध्ये ॲराम्कोचे प्रमुख अमिन नासेर यांनी पाश्चिमात्य देशांच्या निर्णयांवरही घणाघाती टीका केली. ऊर्जा कंपन्यांवर कर लादून व वीजबिलांवर मर्यादा घालून जागतिक ऊर्जा संकटावर तोडगा निघणार नाही, असा टोलाही नासेर यांनी यावेळी लगावला.

गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन तसेच वीजेच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून पाश्चिमात्य देशांसह अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसला आहे. त्याचवेळी जगभरातील कोट्यावधी जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’च्या संकटालाही तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्था मंदावेल, अशी भाकिते वर्तविण्यात येत आहे. यासाठी रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत असल्याचे दावे पाश्चिमात्य विश्लेषक तसेच अभ्यासगटांकडून करण्यात येत आहे.

इंधनक्षेत्रातीलमात्र इंधनउत्पादनातील आघाडीचा देश असणाऱ्या सौदी अरेबियातील प्रमुख कंपनी ‘ॲराम्को’च्या प्रमुखांनी ही बाब स्पष्ट शब्दात खोडून काढली. ऊर्जा संकट तीव्र होण्यासाठी युक्रेनमधील संघर्ष कारणीभूत ठरला असला तरी मुळात हे संकट चुकीची धोरणे व निर्णयांमुळे निर्माण झाल्याची जाणीव ॲराम्कोचे प्रमुख नासेर यांनी करून दिली. ‘गेल्या दशकापासूनच ऊर्जाविषयक धोरणात धोक्याच्या चिन्हे दिसण्यास सुरुवात झाली होती. तेल व नैसर्गिक इंधनवायूमधील गुंतवणूक घटली तर या क्षेत्रातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटू शकतो. याचे गंभीर परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतील, याकडे आमच्यासारखे अनेक जण सातत्याने लक्ष वेधत होते’, असा दावा नासेर यांनी केला.

इंधनक्षेत्रातील‘२०१४ सालानंतरच्या सात वर्षात तेल व इंधनवायू क्षेत्रातील गुंतवणुकीत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. २०१४पूर्वी ही गुंतवणूक ७०० अब्ज डॉलर्स होती. आता ती जेमतेम ३०० अब्ज डॉलर्सच्या वर आहे. या वर्षात त्यात थोडीफार वाढ दिसली असली तरी ती खूपच कमी व उशिराने झाली आहे’, याकडेही ॲराम्कोच्या प्रमुखांनी लक्ष वेधले. इंधनक्षेत्रासंदर्भात करण्यात आलेली भाकितेही चुकीची ठरल्याचा ठपका नासेर यांनी यावेळी ठेवला. कच्च्या तेलाचा वापर करणारी क्षेत्रे पर्यायी इंधनाचा वापर करतील तसेच हरित ऊर्जेचे पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, यासारखे दावे फोल ठरल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, युरोपने यावर्षी अधिक गोठविणाऱ्या व कठोर हिवाळ्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी असा इशाराही ॲराम्कोच्या प्रमुखांनी दिला.

leave a reply