जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीरच्या केरण सेक्टरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशदवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलाचे पाच जवान शहीद झाले आहेत. रविवारी काश्मीर खोऱ्यात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळण्यात आला होता. चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. मात्र चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. त्या जखमी जवानांनाही सोमवारी वीरमरण आले.
रविवारी केरण सेक्टर येथील नियंत्रणरेषेवरून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सुरक्षादलाच्या जवानांच्या लक्षात आले. यावेळी सुराक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. तर चार जवान जखमी झाले होते. सोमवारी गंभीर जखमी झालेल्या चारही जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहीद झालेल्या जवानांमध्ये हिमाचल प्रदेशचे सुभेदार संजीव कुमार, उत्तराखंडचे हवालदार दवेंद्र सिंग, हिमाचल प्रदेशचे पॅराट्रूपर बाल कृष्ण, उत्तराखंडचे पॅराट्रूपर अमित कुमार आणि राजस्थानचे छत्रपाल सिंह यांचा समावेश आहे. शहीद झालेल्या हिमाचल प्रदेशच्या दोन्ही जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.