जर्मन चॅन्सेलरकडून ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीला स्थगिती

बर्लिन – रशियातून जर्मनीसह युरोपिय देशांना पुरवठा करणार्‍या ‘नॉर्ड स्ट्रीम२’ या इंधनवाहिनीला मंजुरी देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी ही घोषणा केली. जर्मनी पूर्व युक्रेनमधील प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार नाही व त्याचवेळी रशियाबरोबरील इंधनवाहिनीच्या मान्यतेवरही पुनर्विचार करण्यात येईल, असे शोल्झ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘नॉर्ड स्ट्रीम२’ हा रशिया व जर्मनीतील महत्त्वाकांक्षी इंधनप्रकल्प असून अमेरिकेसह काही युरोपिय देशांनी याला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. मात्र जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अमेरिकेने या प्रकल्पावर आधीच निर्बंध लादले आहेत. आता जर्मन चॅन्सेलरच्या घोषणेमुळे हा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply