जेरूसलेम – भारत, अमेरिका, युएई व इस्रायल यांच्यातील ‘आयटूयुटू’ हा गट म्हणजे पश्चिम आशियातील क्वाड असल्याचा दावा केला जातो. या संघटनेतील भारताचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. ही बाब गेमचेंजर असल्याचा दावा इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल याकोव अमिद्रोर यांनी केा आहे. जगभरातील विश्लेषक देखील ‘आयटूयुटू’कडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून याचा फार मोठा लाभ भारताला मिळेल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्रायलला भेट दिली होती. त्यावेळी झालेल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये चारही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या गटाची घोषणा केली होती. चारही देशांमधील सहकार्य वाढवून धोरणात्मक भागीदारी भक्कम करण्यावर चारही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे एकमत झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्क्ष ज्यो बायडेन आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या इस्रायल भेटीत आयटूयुटूच्या राष्ट्रप्रमुखांची व्हर्च्युअल चर्चा पार पडेल.
अरब-आखाती देशांनी आपले पारंपरिक इस्रायलविरोधी धोरण सोडून इस्रायलशी सहकार्य करण्यासाठी पावले उचललीआहेत. युएई, बाहरिन या देशांबरोबरच इजिप्त आणि मोरोक्को हे देश इस्रायलशी सहकर्य प्रस्थापित करणाऱ्या ‘अब्राहम अकॉर्ड’मध्ये सहभागी झाले आहेत. सौदी अरेबियाही लवकच असा निर्णय घेईल, असे दावे केले जातात. इस्रायल हा काही सौदीचा वैरी नसल्याची घोषणा सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केली होती. आखाती क्षेत्रातील राजकारण या घडामोडींमुळे ढवळून निघालेले आहे.
आखाती क्षेत्रातील समीकरणे बदलत असताना, अमेरिकेने पुढाकारघेऊन इस्रायल व युएईबरोबरील सहकार्यात भारतालाही सहभागी करण्याचा धोरणात्मक निर्णयघेतलेला आहे. अब्राहम कराराची व्याप्ती वाढविण्याची क्षमता भारताकडे आहे, असे सांगून इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल याकोव अमिद्रोर यांनी भारताची प्रशंसा केली. हा करार जगाच्या भल्याचा आहे, हे इतर देशांना पटवून देण्याची क्षमता भारताकडे असल्याचे अमिद्रोर म्हणाले.
भारत अमेरिका-जपान व ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या क्वाडमध्ये सामीलझालेला आहे. त्याचवेळी पाश्चिम आशियातील क्वाड मानल्या जाणाऱ्या इस्रायल-युएई व अमेरिकेबरोबरील आयटूयुटूमध्येही भारताचा सहभाग आहे. ही बाब भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व वाढत असल्याचे दाखवून देत आहे.