इस्रायल इस्लामी देशांचा सर्वात मोठा शत्रू आहे

- इराणचा सौदीला इशारा

सर्वात मोठा शत्रूतेहरान – ‘इस्लामी आणि अरब देशांचा सर्वात मोठा शत्रू इस्रायल आहे व हे कुणीही विसरू नये’, असा दावा इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी यांनी केला. काही तासांपूर्वी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायल सौदीचा भविष्यातील सहकारी देश ठरू शकतो, असे विधान केले होते. त्यावर इराणची ही प्रतिक्रिया आली आहे.

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकन मासिकाशी बोलताना इस्रायल सौदीचा सर्वात मोठा शत्रूभविष्यातील सहकारी देश ठरू शकतो, असे लक्षवेधी विधान केले होते. त्याचबरोबर सौदी व इस्रायल समान हितसंबंधांवर एकत्रितपणे काम करू शकतात, असेही क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी यांचा इशारा आला आहे.

‘इराकच्या मध्यस्थीने सौदी अरेबियाबरोबर सुरू असलेल्या चर्चेत इराण सहभागी झाला असून सौदीशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इराणचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी इस्रायल हा इस्लामी व अरब जगताचा शत्रू आहे, हे आपण विसरता कमा नये’, असे शामखानी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी थेट उल्लेख केला नसला तरी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासाठी हा इशारा असल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत.

leave a reply