इराणचे राष्ट्राध्यक्ष सिरियात दाखल होण्याआधी इस्रायलचे हवाई हल्ले

- सात जण ठार

बैरूत/दमास्कस – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आपल्या पहिल्या सिरिया दौऱ्यावर दाखल झाले आहेत. याच्या काही तास आधी इस्रायलने सिरियाच्या अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात सात जण ठार झाले. यामध्ये चार सिरियन अधिकारी तर तीन इराणसंलग्न दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे अलेप्पोवरील कारवाईतून इस्रायलने इराणला संदेश दिल्याचा दावा केला जातो.

इराणचे राष्ट्राध्यक्ष सिरियात दाखल होण्याआधी इस्रायलचे हवाई हल्ले - सात जण ठार२०११ सालापासून सिरियामध्ये गृहयुद्ध भडकले आहे. अमेरिका, पाश्चिमात्य व अरब मित्रदेश सिरियातील अस्साद राजवटीच्या विरोधात असताना रशिया व इराणने कायम अस्साद यांचे समर्थन केले होते. पण गेले दशकभर इराणच्या नेतृत्वाने सिरियाचा दौरा केला नव्हता. अशा परिस्थितीत, बुधवारी सकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी दमास्कस विमानतळावर दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष रईसी लवकरच सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची भेट घेणार आहेत.

पण त्याआधी इस्रायलने सिरियात पुन्हा हवाई हल्ले चढविल्याचा आरोप स्थानिक मानवाधिकार संघटनेने केला. सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो विमानतळावर इस्रायलने चढविलेल्या या हल्ल्यात इराणसंलग्न संघटनेच्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा या मानवाधिकार संघटना करीत आहेत. येथील नयरब लष्करी तळाजवळ झालेल्या या हल्ल्यात सिरियन लष्कराचे चार जवान तर इराणसंलग्न संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाल्याचे ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून शस्त्रास्त्रांचे कोठार नष्ट झाल्याचा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply