इस्रायलचे ड्रोन ‘स्टेल्थ ग्रॅव्हिटी बॉम्ब’ने सज्ज करता येतील

इस्रायलच्या लष्कराची घोषणा

तेल अविव – आपल्या लष्करी तंत्रज्ञानाबाबत जगाचे लक्ष खेचून घेणाऱ्या इस्रायलने नवी घोषणा केली. शत्रूच्या यंत्रणांना पकडता येणार नाही आणि किमान एक टन स्फोटके वाहून नेणारे ‘स्टेल्थ ग्रॅव्हिटी बॉम्ब’ इस्रायलच्या नव्या ड्रोन्समध्ये सज्ज करता येतील, अशी लक्षवेधी घोषणा इस्रायलच्या लष्कराने केली. याबरोबर इस्रायलने पहिल्यांदाच आपल्याकडे शस्त्रसज्ज ड्रोन्स असल्याचे जाहिररित्या मान्य केले आहे.

Heron-Mk2-1अमेरिकेच्याही आधी इस्रायल क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या ड्रोन्सची निर्मिती करीत असल्याचे दावे केले जात होते. इस्रायलकडे हेरॉन प्रकारातील गस्ती ड्रोन्स आहेत. पण अमेरिकेच्या प्रिडेटरप्रमाणे आपल्याकडे हल्लेखोर ड्रोन्स आहेत, याबाबत इस्रायलने कधीही माहिती पुरविली नव्हती. पण काही दिवसांपूर्वीच इस्रायलच्या लष्कराने अतिशय धक्कादायक माहिती उघड केली.

इस्रायलकडे क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हल्लेखोर ड्रोन्स असल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. जगातील अतिशय घातक असे ड्रोन इस्रायलच्या लष्कराकडे आहे, अशी घोषणा लष्कराने केली. इस्रायलचे हवाईदल आणि आर्टिलरी विभाग या ड्रोन्सचा वापर करीत आहे. रशिया-युक्रेन युद्धात वापरल्या जाणाऱ्या आत्मघाती ड्रोन्सपेक्षा इस्रायलचे ड्रोन वेगळे आहेत. प्रगत लढाऊ विमानाचे काम आपले हे ड्रोन करीत असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला.

इस्रायलच्या ताफ्यात प्रवासी विमानाच्या आकाराचे हेरॉन टीपी तर लहान आकाराचे हर्मिस असे क्षेपणास्त्रे सज्ज करता येतील ड्रोन्स आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक टन स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले ड्रोनदेखील इस्रायलकडे असल्याचा दावा लष्करी अधिकाऱ्याने केला. या ड्रोन्सचे तपशील जाहीर करण्याची परवानगी नाही. पण शत्रूला गुंगारा देणारे स्टेल्थ ग्रॅव्हिटी बॉम्ब इस्रायली ड्रोन वाहून नेऊ शकते, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराची ही घोषणा इराणसाठी इशारा ठरते.

हिंदी

leave a reply