सोमालियातील अमेरिकेच्या कारवाईत ‘आयएस’चा अल-सुदानी ठार

bilal_al-sudaniवॉशिंग्टन – अमेरिकेच्या लष्कराने सोमालियामध्ये केलेल्या मोठ्या कारवाईत ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा स्थानिक प्रमुख बिलाल अल-सुदानी याला ठार केले. आफ्रिकेतील सोमालियाच्या लष्कराविरोधात अमेरिकेने केलेली ही मोठी कारवाई असल्याची माहिती संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली. यामुळे आफ्रिकेसह अफगाणिस्तानातील आयएसच्या कारवायांना फटका बसल्याचा दावा अमेरिका करीत आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी गुरुवारी माध्यमांसमोर सोमालियातील कारवाईची माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी २५ जानेवारी रोजी सोमालियाच्या उत्तरेकडील भागात आयएसच्या ठिकाणावर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या संघर्षात बिलाल अल-सुदानी याच्यासह दहा दहशतवादी मारले गेल्याची माहिती, अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. आफ्रिकेतील आयएसच्या वाढत्या प्रभावासाठी अल-सुदानी जबाबदार होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील आयएस-खोरासानच्या कारवायांनाही अल-सुदानी फंडींग पुरवित होता, असे ऑस्टिन यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात अमेरिकेने सोमालियात केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरते. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या लष्कराने सोमालियातील अल-शबाब या अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनेवरही हल्ले चढविले होते.

leave a reply