‘जेपी मॉर्गन’ने अमेरिकेतील दिवाळखोर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केली

- अमेरिकेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अपयशी बँक

वॉशिंग्टन – अमेरिकेसह जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांपैकी एक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘जेपी मॉर्गन चेस’ने अमेरिकेतील ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केल्याचे जाहीर केले. गेल्याच महिन्यात बँकेच्या ग्राहकांनी तब्बल १०० अब्ज डॉलर्स बँकेतून काढून घेतल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे अमेरिकी यंत्रणेने त्याचा ताबा घेऊन बँक विक्रीला काढत असल्याची घोषणा केली होती. ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ दिवाळखोर होणे हे अमेरिकी बॅकिंगच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे प्रकरण ठरले आहे. या घटनेने अमेरिकेच्या बॅकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘जेपी मॉर्गन’ने अमेरिकेतील दिवाळखोर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केली - अमेरिकेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अपयशी बँकमार्च महिन्यात अवघ्या काही दिवसांच्या अवधीत अमेरिकेतील तीन बँका एकापाठोपाठ एक करत कोसळल्या होत्या. त्यात ‘एसव्हीबी’, ‘सिग्नेचर बँक’ व ‘सिल्व्हरगेट’ यांचा समावेश होता. या बँकांच्या अपयशानंतर सुरू झालेल्या पडझडीत ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’चे नाव समोर आले होते. विम्याचे संरक्षण नसलेल्या ठेवींची मोठी टक्केवारी हे त्यामागील प्रमुख कारण ठरले होते. मार्च महिन्यात कोसळणाऱ्या बँकांपैकी ‘एसव्हीबी’ व ‘सिग्नेचर बँक’ या बँकांना बायडेन प्रशासनाने अर्थसहाय्य देऊन वाचविले होते. मात्र हाच उपाय सर्व बँकांबाबत शक्य नसल्याचे संकेत सरकारने दिले होते.

याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’चा तिमाही अहवाल जाहीर झाला. त्यात बँकेच्या ग्राहकांनी तब्बल १०० अब्ज डॉलर्सहून अधिक ठेवी बँकेतून काढून घेतल्याचे समोर आले. बँकेतील ५० टक्क्यांहून अधिक ठेवी काढून घेतल्याने इतर व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला व समभागांमध्ये जबरदस्त प्रमाणात घसरण झाली. या घटनाक्रमामुळे ग्राहक व गुंतवणूकदारांचा बँकेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा स्पष्ट संदेश बँकिंग क्षेत्रात गेला. पुढे अधिक पडझड टाळण्यासाठी अमेरिकेच्या ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ने (एफडीआयसी) बँकेचा ताबा घेत असल्याची घोषणा केली.

‘जेपी मॉर्गन’ने अमेरिकेतील दिवाळखोर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केली - अमेरिकेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अपयशी बँकत्यानंतर ‘एफडीआयसी’ने तातडीने बँक विक्रीला काढत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोमवारी जेपी मॉर्गन चेस चे प्रमुख जेमी डिमॉन यांनी ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केल्याची माहिती दिली. अमेरिकी सरकारने आमच्यासह इतरांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले व आम्ही ते स्वीकारले, अशा शब्दात डिमॉन यांनी खरेदीची माहिती दिली. सोमवारपासून ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’च्या ८४ शाखा ‘जेपी मॉर्गन’च्या शाखा म्हणून कार्यरत होतील, असेही डिमॉन यांनी जाहीर केले. जवळपास २३० अब्ज डॉलर्सहून अधिक मालमत्ता असणारी ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ ही २०२२ सालच्या अखेरीस देशातील १४व्या क्रमांकाची मोठी बँक म्हणून समोर आली होती. १९८५ साली सुरू झालेल्या या बँकेने कॅलिफोर्निया प्रांतातून आपली सुरुवात करीत देशातील आठ राज्यांमध्ये आपल्या शाखा उघडल्या होत्या. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गसह अनेक बड्या उद्योजकांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा करणारी बँक ही ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’ची ओळख होती. ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’त जवळपास सात हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

‘जेपी मॉर्गन’ने अमेरिकेतील दिवाळखोर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केली - अमेरिकेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अपयशी बँक‘फर्स्ट रिपब्लिक बँके’च्या अपयशाने अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावरील संकटाचे सावट पूर्ण दूर झाले नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या बँकेची खरेदी प्रक्रिया सुरू असतानाच अमेरिकेच्या इतर स्थानिक बँकांचे समभाग घसरत असल्याचेही समोर आले आहे. त्याचवेळी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीचा अहवालही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात पुन्हा उलथापालथी होण्याचे दावे विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या तिमाही अहवालातून याला दुजोरा मिळाला आहे.

२०२२ सालच्या अखेरच्या तुलनेत नव्या वर्षातील पहिल्या तिमाहीत अमेरिकी अर्थव्यवस्थेत घसरण नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत अमेरिकेच्या जीडीपीत २.६ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे मंदी नसून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दावे सुरू झाले होते. मात्र जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत अमेरिकेचा जीडीपी अवघा १.१ टक्का नोंदविण्यात आला. २०२२ सालच्या अखेरच्या तुलनेत ही घसरण मोठी असल्याने अर्थव्यवस्था पुन्हा मंदीकडे झुकत असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’च्या अपयशाने त्यात अधिकच भर पडल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply