मार्च २०२१ पर्यंत बँक खाती आधारशी जोडण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली – ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व बँक खाती ग्राहकांच्या आधार क्रमांकाशी आणि पॅनकार्डशी जोडली गेली पाहिजेत, असे निर्देश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिले. याचबरोबर बँकांनी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेही सीतारामन पुढे म्हणाल्या.

आधार

अद्याप बरीच बँक खाती याआधारकार्डशी जोडण्यात आलेली नाहीत. फायनान्सशियल इन्कल्युजन अर्थात आर्थिक समवेशनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बँकांनी यावर अधिक काम करावे. बँक खाती आधारकार्डाबरोबर जोडणे गरजेचे असल्याची सूचना सीतारामनयांनी दिली. इंडियन बँक असोसिएअशन या बँकांच्या संघटनेच्या 73 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

यासह यूपीआय आधारित देयके स्वीकारावी. बँकांमध्ये यूपीआय हा परवलीचा शब्द झाला पाहिजे. बँकांनी रूपे कार्डला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्राहकांना कार्ड हवे असल्यास त्यांना रूपे कार्ड पुरविण्यात यावे असेही सीतारामन म्हणाल्या.

leave a reply