यांगून – म्यानमारच्या लष्करी राजवटीने राखिन प्रांतातील ‘आराकान आर्मी’ला दहशतवादी गटांच्या यादीतून हटविल्याची घोषणा केली आहे. या संघटनेकडून होणारे हल्ले थांबले असून शांतीप्रक्रिया सुरू करण्यासाठी सदर निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण लष्करी राजवटीकडून देण्यात आले आहे.
गेल्या काही दशकांपासून ‘आराकान आर्मी’ ही दहशतवादी संघटना राखिन प्रांताला अधिक स्वायत्तता मिळविण्याची मागणी पुढे करून दहशतवादी हल्ले चढवित आहे. या संघटनेला चीनकडून शस्त्रे व इतर सहाय्य मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संघटनेने भारताच्या हितसंबंधांवरही हल्ले चढविल्याचे समोर आले होते.