‘साऊथ चायना सी’मधून फ्रान्सच्या पाणबुडीची गस्त

पाणबुडीची गस्तपॅरिस – फ्रान्सच्या आण्विक पाणबुडी आणि विनाशिकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून गस्त घातली आहे. फ्रान्सचे नौदल दीर्घ मुदतीसाठी या क्षेत्रात आपल्या मित्रदेशांसह नौदल तैनातीसाठी तयार आहे, हे या गस्तीतून स्पष्ट होते, अशी घोषणा फ्रान्सच्या संरक्षमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी केली.

भारत, जपान व ऑस्ट्रेलियासह ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात आघाडी उघडण्याची घोषणा करणार्‍या फ्रान्सच्या पाणबुडीची ही गस्त महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे फ्रान्सच्या या गस्तीवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणार्‍या जहाजांवर कारवाई केली जाईल, असे चीनने धमकावले आहे.

leave a reply