रेल्वेकडून पाच राज्यांमध्ये ९६० आयसोलेशन कोच तैनात

नवी दिल्ली – देशात कोरोनारूग्णांची वाढती संख्या पाहता भारतीय रेल्वेने दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यात ९६० आयसोलेशन कोच तैनात केले आहेेत. दिल्लीत रूग्णालयांची अपुरी संख्या लक्षात घेऊन दिल्लीच्या शकूरबस्ती रेल्वे स्टेशनच्या देखभाल दुरूस्ती विभागात ५४ आयसोलेशन कोचचे हॉस्पिटल आणि शकूरबस्ती रेल्वे स्टेशनवर १० डब्यांचे आयसोलेशन सेंटर सुरू झालेे आहे. तर आनंद विहार रेल्वे स्टेशनवर आयसोलेशन सेंटर बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway-Isolationभारतीय रेल्वेने दिल्लीमध्ये नऊ विविध स्थानकांवर ५०३ आयसोलेशन कोच तैनात केले आहेत. या आयसोलेशन कोचमध्ये ८००० खाटा उभारणार आहेत. हे आयसोलेशन कोच आनंद विहार स्टेशनवर तैनात केले जाणार आहेत. यासाठी आनंद विहार स्टेशनवरील सात प्लॅटफॉर्म आरक्षित करण्यात आले आहेत. यामुळे आनंद विहार स्टेशनवरून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व रेल्वे दिल्ली स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या आइसोलेशन कोचमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीप्रमाणे उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि राजस्थानमध्येही आयसोलेशन सेंटर उभारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ७० आयसोलेशन कोच देण्यात आले आहे. हे कोच पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, वाराणासी, भदोई, फैजाबाद, सहारनपुर, मिर्जापुर आणि झाशीमध्ये तैनात करण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशला २० आणि तेलंगाणाला ६० कोच देण्यात आले आहे. तर राजस्थानमधील उत्तर-पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या जोधपूर विभागाने रूग्णालयात बेडची कमतरता लक्षात घेऊन १५० कोचचे आयसोलेशन सेंटर बनविले आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रेल्वे कोचमधील आयसोलेशन केंद्रात ठेवले जाईल. कोरोनाच्या संशयित रूग्णांसाठी स्वतंत्र कोच तयार केले जाणार आहेत.

leave a reply