‘न्यू स्टार्ट ट्रिटी’च्या मुदतवाढीवर अमेरिका, रशिया यांच्यात एकमत

एकमतमॉस्को – अमेरिका आणि रशियाची अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित करण्यासंदर्भात झालेल्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ची मुदत वाढविण्यावर उभय देशांमध्ये एकमत झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. रशियन संसदेने अवघ्या काही तासातच सदर कराराच्या मुदतवाढीचा प्रस्ताव पारित केला.

अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये दोन दिवसांपूर्वी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’बरोबरच इतर मुद्यांवरही चर्चा झाली. यावेळी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याविषयी उभय देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी तत्वत: मान्यता दिल्याचे रशियन सरकारने जाहीर केले. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी यावर समाधान व्यक्त केले. अमेरिकेने आपल्या अटींवर मुदतवाढ मान्य केल्याची माहिती रशियन सरकारने दिली. तसेच बुधवारी रशियन संसदेत कुठल्याही आडकाठीशिवाय सदर कराराचा प्रस्ताव संमत करण्यात आला.एकमत

बायडेन प्रशासनाने यासंबंधी माहिती देण्याचे टाळले आहे. पण अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सदर कराराची तातडीने अंमलबजावणी देण्यासंबंधी आपल्या अधिकार्‍यांना आदेश दिल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दिली. तसेच राष्ट्राध्यक्ष बायडेन ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’च्या मुदतवाढीसाठी अमेरिकन सिनेट व काँग्रेसच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा दावा केला जातो. अमेरिका व रशियातील या स्टार्ट कराराची मुदत येत्या ५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार होती. या पार्श्‍वभूमीवर, उभय देशांकडून सदर कराराच्या मुदतवाढीसाठी ही घाई सुरू असल्याचे बोलले जाते.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी एप्रिल २०१० साली ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’वर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’नुसार दोन्ही देश १,५५०हून अधिक अण्वस्त्रे तसेच ७०० पेक्षा अधिक आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करु शकत नाहीत. एकमतत्याचवेळी परस्परांच्या अण्वस्त्रतळांची पाहणी करण्याच्या तरतुदीचाही करारात समावेश आहे. अमेरिका आणि रशियातील या करारामुळे युरोपिय देशांची सुरक्षा देखील अबाधित असल्याचा दावा युरोपिय महासंघाने याआधी केला होता.

पण अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबरच्या अणुकराराला विरोध केला होता. सदर करार अमेरिकेला बंधनात ठेवणारा व रशियाला खुले सोडणारा असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. या कराराच्या आड रशिया आणि चीनने आपल्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी सदर करारातून माघार घेतली होती. रशियासह चीनने देखील या करारात सामील व्हावे, अशी अट ट्रम्प यांनी घातली होती. रशियाने देखील चीनला अमेरिकेच्या मागणीवर विचार करण्याचे सुचविले होते. मात्र चीनने अमेरिकेची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली होती. अमेरिका व रशियाकडे आपल्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक अण्वस्त्रे असल्याचे सांगून चीनने करारात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी रशियाबरोबरच्या करारात सहभागी न होता अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची क्षमता वाढवित नेणार असल्याचे जाहीर केले होते.

leave a reply