वाढत्या व्यापाराच्या पार्श्वभूमीवर रशिया-चीन इंधनव्यवहारांमधून डॉलर हद्दपार करणार

- रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक

डॉलर हद्दपारमॉस्को/बीजिंग – रशिया आणि चीनमधील इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील व्यापारातून डॉलर हद्दपार करून राष्ट्रीय चलनांमध्ये व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे, असे वक्तव्य रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी केले. यावेळी त्यांनी रशिया व चीनमधील इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील व्यापार ६४ टक्क्यांनी वाढल्याचा दावाही केला.

डॉलर हद्दपाररशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाने आपले इंधन आशियाई देशांकडे वळविण्यास सुरुवात केली आहे. यात चीन व भारत आघाडीवर असून या देशांनी रशियन इंधनाची आयात प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. या वाढत्या इंधन निर्यातीमुळे रशियाच्या चीनबरोबरील द्विपक्षीय व्यापारातही मोठी भर पडली आहे. यावर्षी पहिल्या १० महिन्यांमध्येच दोन्ही देशांमधील व्यापार १५० अब्ज डॉलर्सवर गेल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

या पार्श्वभूमीवर, रशियन उपपंतप्रधान नोवाक यांनी द्विपक्षीय व्यापारात राष्ट्रीय चलनांवर भर देण्याचे वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले आहे.

leave a reply