मोगादिशू – सोमालियाच्या सुरक्षा यंत्रणांनी नैऋत्य भागात केलेल्या कारवाईत ‘अल-शबाब’ या संघटनेच्या सात दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईबरोबर येथील सेधेलो भागावर सोमालिन लष्कराने नियंत्रण मिळल्यिाची माहिती स्थानिक माध्यमे देत आहेत.
अल कायदासंलग्न अल-शबाबच्या दहशतवाद्यांना सोमालियातून हुसकावून लावत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे या देशाच्या लष्करी अधिकार्याने सांगितले. सोमालियातील अल-शबाबविरोधातील कारवाईवर चर्चा करण्यासाठी ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी बुधवारी सोमालियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष फारमाओ यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर, सोमालियन लष्कराच्या अल-शबाबवरील कारवाईकडे पाहिले जाते.