युद्ध भडकल्यानंतर इस्रायलवर दरदिवशी तीन हजार क्षेपणास्त्रे कोसळतील

- इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा इशारा

तेल अविव/गाझा – येत्या काळात युद्ध भडकलेच तर इस्रायलला भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. इस्रायलवर एकाचवेळी सिरिया, येमेन, इराक त्याचबरोबर गाझापट्टीतून हल्ले चढविले जातील. दर दिवशी तीन हजार क्षेपणास्त्रे इस्रायलवर कोसळतील, असा इशारा इस्रायलचे निवृत्त लष्करी अधिकारी जनरल इत्झाक ब्रिक यांनी दिला. हा धोका ओळखून इस्रायलच्या नेत्यांनी तातडीने लष्कराला एकाच वेळी अनेक आघाड्यांवरील युद्धासाठी सज्ज करावे, असा सल्ला जनरल ब्रिक यांनी दिला.

युद्ध भडकल्यानंतर इस्रायलवर दरदिवशी तीन हजार क्षेपणास्त्रे कोसळतील - इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा इशाराइस्रायली वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जनरल इत्झाक ब्रिक यांनी इस्रायलचे लष्कर भीषण युद्धासाठी तयार नसल्याचा दावा केला. गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलने एका वेळी एकाच आघाडीवर संघर्ष केला होता. यासाठी जनरल ब्रिक यांनी मे महिन्यात गाझापट्टीतील हमासविरोधी संघर्षाचा दाखला दिला. ११ दिवस चाललेल्या या संघर्षात हमासने इस्रायलवर ४,००० रॉकेट्सचे हल्ले चढविले. येथे इस्रायलला एकाच आघाडीवर संघर्ष करावा लागला होता. पण येत्या काळात परिस्थिती वेगळी असेल, याची जाणीव जनरल ब्रिक यांनी करुन दिली.

गाझातील हमासबरोबरच इस्रायलवर सिरिया, येमेन व इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांकडून रॉकेट्स, क्षेपणास्त्रे, ड्रोन्सचे हल्ले चढविले जातील, असा इशारा जनरल ब्रिक यांनी दिला. युद्ध भडकल्यानंतर इस्रायलवर दरदिवशी तीन हजार क्षेपणास्त्रे कोसळतील - इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा इशारात्याचबरोबर इस्रायलने शत्रूवर हल्ला चढविलाच तर वेस्ट बँक तसेच इस्रायलमधील संमिश्र वस्ती असलेल्या शहरे तसेच गावांतील अरब आणि ज्यूंमध्ये हिंसाचार भडकू शकतो. रस्त्यारस्त्यांवर ह्या दंगली पेट घेतील आणि यात भीषण जीवितहानी होईल, असा गंभीर इशारा जनरल ब्रिक यांनी दिला. मे महिन्यातील संघर्षात वेस्ट बँक तसेच इस्रायलच्या काही शहरांमध्ये असाच हिंसाचार पेटला होता. या पार्श्‍वभूमीवर, जनरल ब्रिक यांनी दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

‘इराण अण्वस्त्रसज्ज झाला तरी त्याचा वापर इस्रायलविरोधात करण्याइतका इराण मुर्ख नाही. कारण इस्रायलवर अणुबॉम्ब टाकला तर सारे जग आपल्याविरोधात जाईल व आपल्यावरही अण्वस्त्राचा हल्ला होईल, याची इराणला पुरेपूर कल्पना आहे. युद्ध भडकल्यानंतर इस्रायलवर दरदिवशी तीन हजार क्षेपणास्त्रे कोसळतील - इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा इशाराअण्वस्त्रसज्ज होऊन इराणला फक्त इस्रायलशी आण्विक संतुलन साधायचे आहे. कारण अण्वस्त्रसज्ज झालेल्या इराणवर आपण हल्ला चढवू शकत नाही, याची इराणला जाणीव आहे’, असे जनरल ब्रिक म्हणाले.

इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांचा हा इशारा इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने उचलून धरला. इस्रायलचे लष्कर भविष्यातील युद्धाची तयारी नसल्याचा दावा इराणी वृत्तसंस्थेने केला आहे. गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी देखील येत्या काळात इस्रायलविरोधात एकाच वेळी हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

leave a reply