तुर्कीने रशियन विनाशिकांची ब्लॅक सीमध्ये कोंडी करावी

- युक्रेनचे तुर्कीला आवाहन

किव्ह/अंकारा – युक्रेनच्या दिशेने प्रवास करणाऱ्या रशियन विनाशिकांना तुर्कीने ब्लॅक सीचा मार्ग पुरवू नये. बॉस्फोरस आणि दर्दानिलेसच्या आखात बंद करावे, असे आवाहन युक्रेनने केले आहे. नाटोचा सदस्य देश आणि युक्रेनप्रमाणेच रशियाबरोबरही मैत्रीपूर्ण सहकार्य असलेला तुर्की या आवाहनामुळे कोंडीत सापडला आहे.

ब्लॅक सी1936 मोंट्रिक्स कन्व्हेन्शननुसार ब्लॅक सीच्या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या विनाशिकांना तुर्की रोखू शकतो. युद्धकाळात किंवा तुर्कीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर ही कारवाई केली जाऊ शकते. त्याचबरोबर तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे. याची पुरेपूर माहिती असलेल्या युक्रेनने तुर्कीला ब्लॅक सीचा मार्ग रोखण्याचे आवाहन केले आहे.

नाटोचा सदस्यदेश असला तरी तुर्कीने रशियाबरोबर सहकार्य वाढविले आहे. म्हणूनच तुर्कीने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील रशियाच्या घुसखोरीवर तुर्कीने दुःख व्यक्त केले असले तरी युक्रेनच्या आवाहनाला तुर्कीकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही.

leave a reply