जपान व फ्रान्समध्ये टू-प्लस-टू चर्चा होणार

टोकिओ – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन आक्रमक लष्करी हालचाली करीत असताना, जपान आणि फ्रान्समध्ये येत्या गुरुवारी ‘टू-प्लस-टू’ चर्चा होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या गुंतवणुकीकडे अधिक लक्ष दिले आहे. तर जपान देखील युरोपिय देशांबरोबर सहकार्य वाढवित आहे. दहा दिवसांपूर्वीच जपान आणि अमेरिकेमध्ये देखील टू-प्लस-टू चर्चा केली होती.

जपान व फ्रान्समध्ये टू-प्लस-टू चर्चा होणारजपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांनी मंगळवारी फ्रान्सबरोबरच्या या चर्चेची माहिती दिली. गुरुवारी पार पडणार्‍या या व्हर्च्युअल बैठकीत कोरोना, व्यापार तसेच सुरक्षाविषयक मुद्यांवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. क्षेत्रीय मुद्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे परराष्ट्रमंत्री हयाशी यांनी सांगितले. गेल्या महिन्यात जपानमध्येच ही बैठक पार पडणार होती. पण ओमिक्रॉनच्या संकटानंतर सदर बैठक पुढे ढकलली व व्हर्च्युअली आयोजित करण्याचे निश्‍चित झाले.

गेल्या काही आठवड्यांमध्ये जपानने ब्रिटन, जर्मनी या युरोपातील महत्त्वाच्या देशांबरोबर संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रासंबंधी भारताबरोबरही सहकार्य केले आहे.

leave a reply