ब्रिटन व युरोप भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहत आहे

- अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा

वॉशिंग्टन – 2022 सालात चीन 4.3 तर भारत 8.5 इतक्या विकासदराने प्रगती करणार आहेत. कोरोनाची साथ असताना भारतीय अर्थव्यवस्था करीत असलेल्या या जबरदस्त कामगिरीची दखलघेऊन, ब्रिटन व युरोपियन्स भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहत आहेत, असा दावा ‘व्हॉईस ऑफ अमेरिका` या वृत्तसंस्थेने केला. यासाठी ब्रिटन व युरोपिय महासंघ भारताबरोबरील व्यापार वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे या वृत्तसंस्थेने निदर्शनास आणून दिले.

ब्रिटन व युरोप भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहत आहे - अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावाब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांसह युरोपिय महासंघाबरोबरही भारताची मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. भारत ही फार मोठी बाजारपेठ आहेच. पण कोरोनाची साथ असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेने केलेली दमदार कामगिरी या साऱ्या देशांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे ब्रिटन व युरोपिय महासंघ भारताबरोबर व्यापारी करारासाठी उत्सुक आहेत. त्याचवेळी चीनची विस्तारवादी व आक्रमक धोरणे ब्रिटन व युरोपिय महासंघाला भारताच्या अधिक जवळ ढकलत असल्याची नोंद या वृत्तसंस्थेने आपल्या बातमी केली आहे.

भारताला खूश करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही निर्णय घेतले आहेत. यानुसार भारतीयांना व्हिसा देण्याबाबतच्या निर्णयाचा समावेश आहे. याबरोबरच भारतीय विद्यार्थ्यांचा ब्रिटनच्या विद्यापीठांमधील शिक्षणाचा मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी काही निर्णयांची घोषणा केली होती. तसेच भारत व ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू झाली असून यासाठी ब्रिटनचे मोठे शिष्टमंडळ नुकतेच भारताला भेट देऊन आले, याकडे सदर वृत्तसंस्थेने लक्ष वेधले.

तर युरोपिय महासंघाबरोबरील चीनचे राजकीय व व्यापारी पातळीवरील वाद लक्षात घेता महासंघानेही भारताबरोबरील व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, असा दावा व्हॉईस ऑफ अमेरिकाने केला. गेल्या वर्षी ही चर्चा सुरू झाली आहे आणि लवकरच ही चर्चा तडीस जाईल, असा दावा या वृत्तसंस्थेने केला. आत्तापर्यंत अमेरिका किंवा युरोपिय महासंघाने भारताबरोबर द्विपक्षीय व्यापारी करार केलेला नाही. पण उदयाला येत असलेली व्यापारी महाशक्त म्हणून भारताचे महत्त्व अमेरिक व युरोपिय महासंघालाही मान्य ओ. यासाठी भारताबरोबरील व्यापाराला चालना देण्यासाठी अमेरिका व युरोपिय महासंघ पुढाकारघेत असल्याचे व्हॉर्ईस ऑफ अमेरिकेने म्हटले आहे.

leave a reply