युद्ध संपल्यावर युक्रेन आपल्या भयंकर जीवितहानीची माहिती उघड करील

- ब्रिटनमधील युक्रेनच्या राजदूतांचा दावा

लंडन/किव्ह – रशियाविरोधातील युद्ध संपल्यानंतरच युक्रेन आपल्या भयंकर लष्करी जीवितहानीची माहिती उघड करील, असा दावा युक्रेनच्या ब्रिटनमधील राजदूतांनी केला आहे. युद्धात होणाऱ्या हानीबद्दल माहिती जाहीर न करण्याचे धोरण युक्रेन सरकारने स्वीकारले आहे, असे युक्रेनचे राजदूत वादिम प्रिस्तायको यांनी सांगितले. अमेरिका व युरोपिय महासंघातील विविध माध्यमे तसेच विश्लेषकांनी युक्रेनने रशियाविरोधातील संघर्षात एक लाखांहून अधिक जवान गमाविल्याचे दावे केले आहेत. मात्र युक्रेनने हे सर्व दावे फेटाळून लावले होते.

युद्ध संपल्यावर युक्रेन आपल्या भयंकर जीवितहानीची माहिती उघड करील - ब्रिटनमधील युक्रेनच्या राजदूतांचा दावारशियाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला चढविला होता. त्यानंतर रशियाने युक्रेनच्या विविध प्रांतांमध्ये जबरदस्त मारा केला असून त्यासाठी प्रगत क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा वापर केला आहे. युक्रेनवर करण्यात येणाऱ्या या हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराची मोठी हानी होत असल्याचे दावे रशियाकडून वारंवार करण्यात आले होते. मात्र युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी रशियाचे दावे म्हणजे अपप्रचाराचा भाग असल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर, युक्रेनच्या ब्रिटनमधील राजदूतांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. वादिम प्रिस्तायको यांनी एका ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत युक्रेनच्या लष्करी जीवितहानीचा उल्लेख ‘हॉरिबल’ असा केला. मात्र ही हानी युद्ध संपल्यानंतरच जाहीर केली जाईल व हे सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रशिया व युक्रेनमधील शांतीचर्चेची शक्यताही फेटाळून लावली.

युद्ध संपल्यावर युक्रेन आपल्या भयंकर जीवितहानीची माहिती उघड करील - ब्रिटनमधील युक्रेनच्या राजदूतांचा दावागेल्या महिन्यात अमेरिकेतील एका वेबसाईटने तसेच युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी युक्रेनमधील लष्करी जीवितहानीची संख्या एक लाखांहून अधिक असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यांवर युक्रेन सरकारकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघटनेतील माजी वरिष्ठ अधिकारी स्कॉट रिटर यांनी युक्रेनची जीवितहानी तीन लाखांनजिक असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.

यांनी युक्रेनकडे आता वाया घालविण्यासाठी वेळ राहिलेला नाही, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भातील वृत्त देताना, युक्रेनी लष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा व मनुष्यबळही नसल्याचा दावा ‘पॉलिटिको’ या वेबसाईटने केला. याच वृत्तात, अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत युक्रेनने आतापर्यंतच्या संघर्षात जवळपास एक लाख जवान गमावल्याचे वेबसाईटने म्हटले आहे. यात युक्रेनमधील सर्वाधिक प्रशिक्षित व अनुभवी लष्करी तुकड्यांचाही समावेश असल्याचे ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे.

हिंदी English

 

leave a reply