सिरिया व ओमानच्या आखातामध्ये अमेरिकी लष्करावरील हल्ल्यांचा डाव उधळला

- सेंटकॉमचा दावा

ओमानच्या आखातामध्येदोहा – सिरियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकी जवानांवरील रॉकेट्सचे अनेक हल्ले यशस्वीरित्या उधळले आहेत. फक्त सिरियाच नाही तर ओमानच्या आखातून प्रवास करणाऱ्या अमेरिकी जहाजांवरील हल्ले उधळण्यात यश मिळाल्याचा दावा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने केला.

गेल्या गुरुवारी सिरियाच्या ईशान्येकडे असणाऱ्या ‘ग्रीन व्हिलेज’ येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट्सचे हल्ले झाले होते. अशा हल्ल्यांमुळे स्थानिक तसेच अमेरिकी जवानांची सुरक्षा धोक्यात सापडत असल्याची टीका सेंटकॉमने केली होती. तर दोन दिवस आधी ओमानच्या किनारपट्टीजवळ इराणी बनावटीच्या ड्रोनने इस्रायलची मालकी असलेल्या इंधनवाहू जहाजावर हल्ला चढविला होता. यामध्ये सदर जहाजाचे नुकसान झाले होते. या दोन्ही हल्ल्यांची अमेरिकेने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

पण गेल्या काही दिवसांपासून सिरिया व ओमानच्या आखातात अमेरिकी लष्करावरील घातपाती हल्ले वाढल्याचा आरोप सेंटकॉमने केला आहे. नागरी जहाजावर हल्ला चढवून इराण या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा ठपका सेंटकॉमने ठेवला. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने येमेनमधील हौथी बंडखोरांसाठी स्फोटके घेऊन जाणारे जहाज ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे हल्ले वाढल्याचे स्थानिक माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply