अमेरिका ‘विभक्त’ होण्याच्या मार्गावर

- संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिका राष्ट्रीय स्तरावर विभक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी केला. मात्र याचा अर्थ अमेरिकेत गृहयुद्धाच भडका उडेल, असा होत नाही व तसे घडण्याची अपेक्षा नाही, असेही टेलर ग्रीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून ग्रीन यांचे वक्तव्य वेडसरपणाचे तसेच धोकादायक असल्याची टीका करण्यात आली आहे.

‘विभक्त’२०२० साली अमेरिकेत झालेल्या निवडणुकीनंतर तीव्र राजकीय मतभेद व धु्रवीकरणाचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. ६ जानेवारी, २०२१ रोजी अमेरिकेच्या ‘कॅपिटल हिल’वर झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेतील विश्लेषक, राजकीय नेेते, लष्करी अधिकारी तसेच अभ्यासक गृहयुद्धाच्या शक्यतेची वारंवार जाणीव करून देत आहेत. अमेरिकेतील विविध शिक्षणसंस्था व अभ्यासगटांनी केलेली सर्वेक्षणे तसेच अहवालातून अमेरिकी जनतेतील राजकीय मतभेद तीव्र टोकाला गेल्याचे समोर आले आहे.

याच आधारावर काही गट व संसद सदस्य अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाला समर्थन देणाऱ्या प्रांतांची विभागणी करावी, अशी मागणी करीत आहेत. अमेरिकेचे ‘ब्ल्यू स्टेटस्‌‍’ व ‘रेड स्टेटस्‌‍’मध्ये विभाजन करण्याचे प्रस्ताव मांडण्यात येत आहेत. संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी केलेले वक्तव्यही याचाच भाग दिसतो.

‘विभक्त’अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यपद्धतीवर तसेच प्रशासनावर विरोधी पक्ष, माध्यमे तसेच विश्लेषकांकडून सातत्याने टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अमेरिकेतील अंतर्गत समस्यांवर उपाययोजना करण्यात बायडेन सपशेल अपयशी ठरल्याचे विविध अहवाल तसेच सर्वेक्षणांमधूनही समोर आले आहे. २०२० साली झालेली निवडणूक, २०२१ साली अमेरिकी संसदेच्या परिसरात झालेला हिंसाचार व त्यानंतर निर्माण झालेली स्थिती हाताळण्यात बायडेन अपयशी ठरले आहेत. त्यांच्या निर्णयावर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील सदस्य व समर्थकही नाराज असल्याचे दिसून येते.

बायडेन यांच्या धोरणांमुळे अमेरिकी जनतेतील नाराजी व असंतोष वाढत असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. अमेरिकेच्या राजकीय विभाजनाचा प्रस्ताव व मागणीही बायडेन प्रशासनाविरोधातील नाराजीचाच भाग असल्याकडे माध्यमे लक्ष वेधत आहेत.

English हिंदी

leave a reply