सरकार उलथणार्‍या लष्कराच्या विरोधात म्यानमारमध्ये तीव्र निदर्शने

- लष्कराकडून निदर्शकांवर कठोर कारवाईची धमकी

तीव्र निदर्शनेनेप्यितौ – म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात सुरू झालेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र व व्यापक होत चालल्याचे समोर येत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी लष्कर व सुरक्षायंत्रणांनीही तयारी सुरू केली असून कायदा तोडणार्‍या निदर्शकांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी म्यानमारची राजधानी नेपित्यौसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. यांगूनसारख्या देशातील सर्वात मोठ्या शहरात एक लाखांहून अधिक निदर्शक लष्करी राजवटीविरोधात काढलेल्या मोर्च्यात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

गेल्या सोमवारी म्यानमारच्या लष्कराने बंड करून सत्ता हाती घेतली होती. त्यानंतर लष्कराने म्यानमारमधील प्रमुख लोकशाहीवादी नेत्या व ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’च्या अध्यक्ष ‘आँग सॅन स्यू की’, राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांच्यासह शेकडो संसद सदस्य व नेत्यांना अटक केली. म्यानमारच्या लष्कराने आणीबाणीची घोषणा केली असून देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत. म्यानमारच्या लष्कराने केलेले बंड व पुढील कारवाईला चीनचे समर्थन असल्याचे संकेत मिळत आहेत.

तीव्र निदर्शने

मात्र अमेरिका, युरोपिय देश व आग्नेय आशियाई देशांनी म्यानमारच्या लष्कराने केलेल्या बंडाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून निर्बंधांसह कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यापासून म्यानमारच्या जनतेने लष्कराविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मोडण्यासाठी लष्कराने इंटरनेट व सोशल मिडिया अ‍ॅप्सवर बंदीचा बडगा उगारला होता. मात्र तो धुडकावून लावत लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले नागरिक विविध माध्यमांमधून आपला निषेध व्यक्त करीत असल्याचे पहायला मिळाले.

तीव्र निदर्शनेयांगून शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात शिक्षक, विद्यार्थी व सरकारी कर्मचार्‍यांसह बौद्ध भिक्खूंचा गटही सहभागी झाला होता. आंदोलनकर्त्यांनी यावेळी ‘से नो टू डिक्टेटरशिप’, ‘वुई वाँट डेमोक्रसी’, ‘रिलिज अवर लीडर्स’, ‘रिजेक्ट मिलिटरी कॉप’ असे फलक झळकवित प्रमुख लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. म्यानमारची राजधानी नेप्यितौमध्येही हजारो नागरिक लष्करी राजवटीविरोधात रस्त्यावर उतरले तीव्र निदर्शनेअसून सरकारी कर्मचार्‍यांच्या गटांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. म्यानमारमध्ये सुरू झालेली ही निदर्शने २००७ सालानंतरची सर्वात मोठी निदर्शने असल्याचे सांगण्यात येते.

राजधानी नेप्यितौ तसेच यांगूनमध्ये झालेल्या निदर्शनांवर लष्कर तसेच स्थानिक सुरक्षायंत्रणांनी कारवाई केल्याचे समोर आले. यावेळी आंदोलनकर्त्यांवर रसायनमिश्रित पाण्याचे फवारे मारण्यात आल्याचेही समोर आले आहे. म्यानमारमधील आंदोलन अद्याप शांतीपूर्ण असले तरी पुढील काळात लष्कराकडून आक्रमक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, काही गट लोकशाही व मानवाधिकारांचा वापर करून कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशाचे स्थैर्य व सुरक्षेला हानी पोहोचविणार्‍या अशा गटांविरोधात आक्रमक कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले आहे.

leave a reply