अमेरिकी संसद सदस्यांकडून फॉसी यांच्यावर टीकास्त्र

वॉशिंग्टन – अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अँथनी फॉसी यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी यंत्रणेने चीनच्या वुहान लॅबला संशोधनासाठी निधी पुरविल्याचा आरोप अमेरिकी सिनेटर रॉन जॉन्सन यांनी केला. संसद सदस्य माईक गॅलाघर यांनीही फॉसी यांच्यावर टीकास्त्र सोडून वुहान लॅबला दिलेल्या निधीबाबत उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी केली. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणार्‍या जिम जॉर्डन यांनी फॉसी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

अमेरिकी संसद सदस्यांकडून फॉसी यांच्यावर टीकास्त्रडॉक्टर अँथनी फॉसी हे अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी ऍण्ड इन्फेक्शिअस डिसिजेज्’चे प्रमुख आहेत. या संस्थेकडून जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनविषयक सहाय्यात चीनच्या वुहान लॅबचाही समावेश आहे. फॉसी यांनी वुहान लॅबबाबत योग्य माहिती घेऊन सदर सहाय्य बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र तसे न होता सहाय्य चालू राहिले होते, असा दावा सिनेटर जॉन्सन यांनी केला.

अमेरिकी संसद सदस्यांकडून फॉसी यांच्यावर टीकास्त्रचीनबरोबर सहकार्य कायम ठेवण्यामागे नक्की हेतू काय होता, असा सवालही अमेरिकी सिनेटरनी केला. संसद सदस्य माईक गॅलाघर यांनीही वुहान लॅबचा मुद्दा उपस्थित करून फॉसी यांनी त्याची उत्तरे द्यायला हवीत, अशी मागणी केली. सिनेटर जोनी अर्न्स्ट यांनी, वुहान लॅबचा उल्लेख करून चीनच्या सत्ताधारी राजवटीला धारेवर धरले आहे. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी अजूनही कोरोना साथीच्या मुळाबाबत योग्य माहिती द्यायला तयार नाही, अशी टीका अर्न्स्ट यांनी केली. जगाला कोरोना साथीबाबत उत्तरे हवी असून त्यात वुहान लॅबच्या सहभागाचा मुद्दाही समाविष्ट आहे, असे अमेरिकी सिनेटरनी म्हटले आहे.

अमेरिकी संसद सदस्यांनी कोरोनाची साथ व वुहान लॅबचा सहभाग यांच्या चौकशीसंदर्भात परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांना पत्रही लिहिल्याचे समोर आले आहे.

leave a reply