तालिबानला सहाय्य करणार्‍या पाकिस्तानवर निर्बंध टाका

- अमेरिकन संसद सदस्यांची मागणी

वॉशिंग्टन – ‘पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सविरोधी कारवाईसाठी पाकिस्तानने तालिबानला सहाय्य केल्याचे आरोप होत आहेत. पाकिस्तानने तालिबानला सहाय्य केली असेल तर या देशाला मिळणारी मदत थांबविली पाहिजे. त्याचबरोबर तालिबानची निर्मिती आणि त्यांची पाठराखण केल्याबद्दल पाकिस्तानवर निर्बंध लादले पाहिजेत’, अशी मागणी अमेरिकेचे संसद सदस्य ऍडम किंझिंगर यांनी केली.

नॉर्दन अलायन्सविरोधी कारवाईसाठी पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी २७ हेलिकॉप्टर्समधून स्पेशल फोर्सेसचे जवान उतरविले होते. तसेच पंजशीरमध्ये ड्रोन हल्ले घडविले होते. ‘अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिल्याचे अमेरिकेच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. त्यानंतर कॉंग्रेसमन किंझिंगर यांनी ही मागणी केली. अमेरिकेतून याआधीही पाकिस्तानवर निर्बंधांची मागणी झाली होती. अमेरिकेने दहशतवादविरोधी कारवाईसाठी दिलेला पैसा पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरत असल्याचा आरोप झाला होता.

leave a reply