इराणमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांवर – ‘टास्कफोर्स’ च्या अधिकाऱ्यांचा दावा 

 तेहरान – इराणमध्ये कोरोनाव्हायरसने चार हजार जणांचा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत या साथीची लागण झालेल्यांची संख्या ६२ हजारांवर पोहोचली आहे. मात्र उघड करण्यात येत असलेल्या या आकडेवारीच्या  कितीतरी अधिक पट  इराणमध्ये  कोरोनाव्हायरसचे बळी व रुग्ण असल्याची भयंकर माहिती समोर आली आहे .अशा परिस्थितीत  इराणवर लादण्यात आलेले निर्बंध मागे घ्या, असे आवाहन इराणकडून केले जात आहे.     
इराणमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झालेली ही साथ आता वेगाने फैलावत आहे. इराणमध्ये ६२ हजारहून अधिक जणांना या साथीची लागण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे. इराणमध्ये पाच लाखांहून अधिक जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मात्र इराणची यंत्रणा ही माहिती उघड करण्यास तयार नाही. धार्मिक यात्रेमुळे या साथीचा फैलाव वाढला, असा दावा इराणच्या  ‘ नॅशनल कोरोनाव्हायरस  कॉम्बक्ट टास्क फोर्स’ने केला. इराणचे ‘नॅशनल कोरोनाव्हायरस कॉम्बक्ट टास्क फोर्स’चे अधिकारी सांगत आहे, त्यानुसार  कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या  पाच लाखावर असली तरी  इराणची यंत्रणा हे उघड करण्यास तयार नाही.         
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या जनतेला  सहाय्य करण्याची तयारी दाखविली होती . पण इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हे सहाय्य धुडकावले होते.  आता इराणला अमेरिकेचे सहाय्य नको पण  निर्बंध मागे घ्या ,अशी मागणी इराणचे नेते करीत आहेत.  इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांनी  इराणवरील निर्बंध मागे घ्यावेत असे आवाहन केले आहे.                             
या निर्बंधांमुळे इराणला कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करताना फार मोठ्या  अडचणी येत आहेत. मात्र हे निर्बंध मागे घेऊन अमेरिका इराणच्या राजवटीला दडपणातून मुक्त करण्यास तयार नाही उलट काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने इराणवर नव्याने निर्बंध  लादण्याची घोषणा केली होती.   

leave a reply