उपासमारीमुळे अफगाणींवर आपले अवयव विकण्याची वेळ ओढावली

अवयव विकण्याची वेळन्यूयॉर्क/काबुल – ‘लाखो अफगाणी मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अफगाणींच्या मदतीसाठी अधिक विलंब करता येऊ शकत नाही’, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी केले. काही आठवड्यांपूर्वी उपासमारीच्या संकटात सापडलेल्या अफगाणींवर पोटच्या पोरांची विक्री करण्याची वेळ ओढावल्याची थरकाप उडविणारी बातमी समोर आली होती. आता आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अफगाणींना आपल्या अवयवांची विक्री करावी लागत असल्याची विदारक बाब समोर आली आहे.

गेली काही वर्षे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ही पूर्णपण आंतरराष्ट्रीय सहाय्यावर अवलंबून आहे. अफगाणिस्तानातून मखमली गालिचे, सुका मेवा यांची निर्यात केली जाते. तर या देशात एक ट्रिलियन डॉलर्स किंवा त्याहून अधिक किंमतीची खनिजसंपत्ती असल्याचा दावा केला जातो. असे अवयव विकण्याची वेळअसले तरी गेली पाच दशके अफगाणिस्तानची आर्थिकघडी पूर्णपणे विस्कळीत असून अमेरिका, युरोपिय देश, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून मिळणार्‍या आर्थिक सहाय्यावर हा देश सुरू आहे.

अशा परिस्थितीत, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने राजधानी काबुलचा ताबा घेऊन आपली राजवट प्रस्थापित केली. याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले व अमेरिकेसह जागतिक समुदायाने अफगाणिस्तानसाठीचे आर्थिक सहाय्य रोखले. २०२० साली दोहा येथे पार पडलेल्या करारानुसार, तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना केली नसल्याची आठवण करून देत अमेरिकेने अफगाणिस्तानचा सुमारे साडे नऊ अब्ज डॉलर्सचा निधी गोठविला.

तालिबानने देखील मुलींच्या शिक्षणावर बंदी टाकली. महिलांवर जाचक निर्बंध लादले आणि अल्पसंख्यांकावरील कारवाई सुरू ठेवली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे नाकारले. आंतरराष्ट्रीय समुदायाने टाकलेल्या बहिष्कारामुळे अफगाणींवर भीषण संकट कोसळल्याची चिंता व्यक्त केली जाते. सुमारे ८७ लाख अफगाणींवर उपासमारीचे संकट ओढावल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने अवयव विकण्याची वेळदिला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानसाठी पाच अब्ज डॉलर्सचा निधी उभा करण्याचे आवाहन केले होते. पण अजूनही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चिंता महासचिव गुतेरस यांनी व्यक्त केली. भीषण गरिबीचा सामना करणारे अफगाणी आपल्या अवयवांची विक्री करीत असल्याची बातमी या निमित्ताने समोर येत आहे.

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात अफगाणी नागरिक कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दोन ते आठ लाख अफगानींमध्ये आपल्या अवयवांची विक्री करीत आहेत. यासाठी काही अफगाणी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चिंता स्थानिक अफगाणी डॉक्टर्स व वैद्यकीय सल्लागार व्यक्त करीत आहेत. तालिबानच्या राजवटीत रोजगार मिळणे देखील अवघड झाल्यामुळे कुटुंबाच्या पोटासाठी अवयव विकावे लागत असल्याचे काही अफगाणींचे म्हणणे आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील बडाखशान प्रांतात कुपोषणामुळे १०४ जणांचा बळी गेला असून यामध्ये महिला व मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.

leave a reply