अमेरिकेसह ‘जी7’ने युक्रेनचे संरक्षणसहाय्य वाढविले

Ukraine's-defense-supportवॉशिंग्टन/बर्लिन – अमेरिकेह ‘जी7′ गटाने युक्रेनला देण्यात येणाऱ्या संरक्षणसहाय्यात मोठी वाढ केली आहे. अमेरिकेच्या संसदेत युक्रेनला 40 अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. तर जर्मनीत झालेल्या ‘जी7’च्या बैठकीत सात आघाडीच्या देशांनी युक्रेनला जवळपास 20 अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त गुरुवारी बायडेन प्रशासनाकडून युक्रेनला 10 कोटी डॉलर्सचे लष्करी सहाय्य घोषित करण्यात आले.

Ukraine's-defense-support-2गेल्या महिन्यात अमेरिकेने ‘युक्रेन डेमोक्रसी डिफेन्स लेंड-लीझ ॲक्ट ऑफ 2022′ मंजूर केला होता. कायद्यामुळे युक्रेनसह युरोपातील इतर देशांनाही शस्त्रपुरवठा करणे सुलभ होणार असून त्यात इतर नियमांचा अडथळा येणार नाही, असे सांगण्यात येते. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला जवळपास पाच अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचा शस्त्रपुरवठा केला आहे. यात क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रायफल्स, हेलिकॉप्टर्स, सशस्त्र वाहने, रडार्स व इतर लष्करी सामुग्रीचा समावेश आहे.

Ukraine's-defense-support-1मात्र त्यानंतरही अमेरिका व मित्रदेशांकडून युक्रेनला रशियाविरोधात अविरत शस्त्रपुरवठा सुरू रहावा, यासाठी हालचाली सुरू आहेत. अमेरिकेच्या संसदेत मंजूर झालेला नवा कायदा त्याचाच भाग ठरतो. ‘युक्रेन प्लिमेंटल ॲप्रोप्रिएशन्स ॲक्ट’ असे नाव असलेल्या या कायद्यानुसार, युक्रेनला तब्बल 40 अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविण्यात येणार आहे. यातील बहुतांश भाग संरक्षणसहाय्यासाठी वापरण्यात येईल, अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली.

अमेरिकेपाठोपाठ ‘जी7′ गटानेही युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ‘जी7′ देशांनी युक्रेनला 19.8 अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली. यात युक्रेन सरकार चालविण्यासाठी लागणाऱ्या निधीचाही समावेश आहे. गुरुवारी युरोपिय महासंघाने युक्रेनसाठी नऊ अब्ज युरो अर्थसहाय्य जाहीर केले होते.

leave a reply