तैवानमधील ‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’च्या आधुनिकीकरणाला अमेरिकेची मंजुरी

- चीनचे टीकास्त्र

‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’च्या आधुनिकीकरणालावॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने तैवानमध्ये तैनात असलेल्या पॅट्रियट मिसाईल्स सिस्टिमच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे. हा करार सुमारे १० कोटी डॉलर्सचा असून पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिका व तैवानमध्ये झालेला हा दुसरा संरक्षण करार ठरतो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संसदेत ‘आर्म तैवान ऍक्ट’ विधेयकही सादर करण्यात आले होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधातील आक्रमक धोरणाचा भाग म्हणून तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला होता. २०२० साली ऑगस्ट महिन्यात अमेरिका व तैवानमध्ये ‘एफ-१६ व्ही’ या लढाऊ विमानांच्या खरेदीचा महत्त्वाकांक्षी करार करण्यात आला होता.

त्यापाठोपाठ अमेरिकेने तैवानला ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘हाय मार्स’ रॉकेट यंत्रणा, ‘स्लॅम-इआर’ क्षेपणास्त्रे ‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’च्या आधुनिकीकरणालादेण्याचीही घोषणा केली होती. याच काळात तैवानने ‘पॅट्रियट मिसाईल्स’, ड्रोन्स, स्मार्ट माईन्स व हॉवित्झर्ससंदर्भात बोलणी सुरू केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यातील ‘पॅट्रियट’ संदर्भातील मागणीला अमेरिकेने मान्यता दिल्याचे नव्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’च्या वेबसाईटवर यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर तैवानमधील पॅट्रियट मिसाईल्स सिस्टिमच्या ‘सपोर्ट डील’ला मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

क्षेपणास्त्र यंत्रणेचे आधुनिकीकरण तसेच देखभालीसाठी अमेरिकी कंपन्यांना कंत्राट जारी करण्यात आल्याचे ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने म्हटले आहे. हा करार तैवानमधील पॅट्रियट मिसाईल्स सिस्टिम शत्रूच्या आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज राहिल, याची काळजी घेईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’च्या आधुनिकीकरणालातैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. ‘बायडेन प्रशासनाने तैवानला शस्त्रपुरवठा करण्याबाबत घेतलेला हा दुसरा निर्णय आहे. या निर्णयातून अमेरिका व तैवानमधील मजबूत संबंध पुन्हा अधोरेखित होत आहेत’, असे तैवानच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. चीनने अमेरिकेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘पॅट्रियट मिसाईल सिस्टिम’च्या आधुनिकीकरणाला‘अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका व चीन संबंधांना धक्का बसू शकतो. तैेवान व नजिकच्या क्षेत्रातील शांती तसेच स्थैर्य धोक्यात येईल. चीन आपले सार्वभौमत्व व सुरक्षा कायम राखण्यासाठी योग्य उपाययोजना करेल’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी बजावले.

दरम्यान, अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य माईक गॅलाघर यांनी, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तैवानसह पॅसिफिकमधील संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी अधिक तैनाती करायला हवी, अशी भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी गॅलाघर यांनी तैवानला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्स संरक्षणसहाय्य पुरविण्याची तरतूद असलेले ‘आर्म तैवान ऍक्ट’ विधेयक संसदेत सादर केले होते.

leave a reply