अमेरिकेत कोरोनाचे दोन कोटी रुग्ण असू शकतील – आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ४,९३,१८१ वर पोहोचली आहे. तर या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ९७,७३,२५२ वर गेली आहे. मात्र जगभरात ही साथ अतिशय गंभीर स्तरावर पोहोचली असून एकट्या अमेरिकेत या साथीचे किमान दोन कोटी रुग्ण असल्याचा दावा अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेत या साथीचे २५ लाख रुग्ण असल्याची माहिती अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा देत आहेत.

दोन कोटी रुग्ण

गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाव्हायरसने जवळपास सात हजार जणांचा बळी घेतल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वर्ल्डोमीटर सारख्या संघटना देत आहेत. यापैकी एकट्या अमेरिकेत अडीच हजाराहून अधिक जण दगावले असून अमेरिकेत या साथीने दगावणाऱ्यांची एकूण संख्या १,२६,९११ वर पोहोचली आहे. तर ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात सुमारे दोन हजार जण दगावले आहेत. या देशात साथीने बळी गेलेल्यांची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली आहे. युरोपमध्ये या साथीने एकूण १,९०,००० जणांचा बळी गेला आहे.

दोन कोटी रुग्ण

या चोवीस तासात जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या जवळ पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील २१२ देशांमध्ये सुमारे ९७,७३,२५२ कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात सुमारे ४० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२,३३,१४७ वर पोहोचली आहे. तर, अमेरिकेत २५,११,७८४ रुग्ण असून गेल्या चोवीस तासात ३९ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. मात्र अमेरिकेने जाहीर केले आहेत त्याच्या सुमारे दसपट अधिक रुग्ण या देशात असल्याचा दावा अमेरिकेतील आरोग्य अधिकारी करीत आहेत. अमेरिकेतील सुमारे दोन कोटी जणांना या साथीची बाधा झाल्याचा दावा हे आरोग्य अधिकारी करीत आहेत.

दरम्यान, या साथीने जगभरातील सुमारे ५३ हजार उपचाराअंती बरे झाले ही समाधानकारक बाब देखील समोर येत आहे. मात्र या साथीमुळे जगातील मोठ्या वित्तसंस्थांची अवस्था गंभीर बनल्याची चिंता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा क्रिस्तालना जॉर्जिया यांनी व्यक्त केली.

leave a reply