आसाममध्ये भूस्खलनात २० जणांचा बळी, ९ जखमी

गुवाहाटी – मुसळधार पावसामुळे आसामच्या तीन जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये २० नागरिकांचा बळी गेला असून सुमारे ९ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसाम सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Aasam Landslideआसाममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हैलाकंडी, करिमगंज आणि काचर या जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या. रिमगंज जिल्ह्य़ात भूस्खलनामुळे सहा जणांचा बळी गेला. यातली पाच जण एकाच कुटूंबातील असून यात एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. दुसरी घटना काचर जिल्ह्यातील कोलापूर गावात घडली. या ठिकाणी झालेला भूस्खलनात तीन महिलांसह सात जणांचा बळी गेला. तिसरी घटना हैलाकंडी जिल्ह्य़ातील भटारबाझ गावात घडली. येथील एका पत्र्याच्या घरावर दगडमातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मुले आणि एका महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने एस. के. सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासुन या भागात पाऊस कोसळत आहे. मात्र सोमवारी रात्री या भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे भूस्खलनचा घटना घडल्या. या दुर्घटनांनंतर तातडीने मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या कुटूंबास २४ तासांच्या आत ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हा उपायुक्तांना आसाम सरकारने दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामच्या ढेमाजी, नागाव, होजाई, दरंग, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लॉंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या नऊ जिल्ह्यांतील ३५६ गावांना पुराचा फटका बसला आहे. लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. तर २६९७७ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

leave a reply