इराणमधून २७५ भारतीयांची सुटका 

नवी दिल्ली – रविवारी इराणमध्ये अडकलेल्या आणखी २७५ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. राजस्थानच्या जोधपूर विमानतळावर त्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले. या सर्वांना जोधपूरच्या आर्मी वेलनेस सेंटरमध्ये लष्कराच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

 

इराणमध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत ३५ हजारहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे.  तर बळींची संख्या दोन हजारच्या वर जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. रविवारी इराणमधून २७५ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. यात १४२ पुरुष व १३३ महिलांचा समावेश आहे.

 

याआधी इराणमधून २७७ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. ते जोधपूरमध्ये लष्कराच्या देखरेखीखाली आहेत.

leave a reply