भूमध्य समुद्रातील बोटींच्या दुर्घटनेत ५७ जणांचा बळी

- मृतांमध्ये पाकिस्तान, सिरिया, ट्युनिशिया आणि इजिप्तच्या नागरिकांचा समावेश

सित्वे – लिबियातून निर्वासितांना घेऊन निघालेल्या दोन बोटींना भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळाली. यामध्ये ५७ जणांचा बळी गेला असून इतरांचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये पाकिस्तान, सिरिया, ट्युनिशिया आणि इजिप्तच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चार महिन्यात भूमध्य समुद्रातून निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या बोटींना झालेल्या दुर्घटनांमध्ये ३१० जणांचे मृतदेह सापडले असून २२७ जण बेपत्ता आहेत.

भूमध्य समुद्रातील बोटींच्या दुर्घटनेत ५७ जणांचा बळी - मृतांमध्ये पाकिस्तान, सिरिया, ट्युनिशिया आणि इजिप्तच्या नागरिकांचा समावेशआपल्या देशातील अराजकता आणि अस्थैर्याला कंटाळलेले निर्वासित मोठ्या संख्येने लिबिया तसेच तुर्कीमार्गे युरोपमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रीसने सीमेवरील तैनाती वाढवून बेकायदा निर्वासितांना प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे तुर्कीतून युरोप गाठणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पण लिबियातून इटली, फ्रान्स व स्पेन गाठणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया यांच्यासह आफ्रिकी देशांमधील शेकडो निर्वासित दररोज लिबियातून बोटीद्वारे युरोप गाठण्याचा प्रयत्न करतात. पण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या बोटी भूमध्य समुद्राच्या खराब हवामानात सापडून जलसमाधी मिळाल्याच्या घटना वाढत आहेत. भूमध्य समुद्रातील बोटींच्या दुर्घटनेत ५७ जणांचा बळी - मृतांमध्ये पाकिस्तान, सिरिया, ट्युनिशिया आणि इजिप्तच्या नागरिकांचा समावेशगेल्या चार महिन्यांमध्ये युरोपिय देशांच्या तटरक्षकदलांनी अशा ४,३३५ बेकायदा निर्वासितांचा जीव वाचविला आहे.

पण अशा दुर्घटनांमध्ये ३१० जणांचा बळी गेल्याचेही ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ लक्ष वेधत आहे. मंगळवारी देखील प्रत्येक बोटीत ८० बेकायदेशीर निर्वासितांना बसवून नेले जात असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे ५७ जणांचा बळी गेला तर ६० जणांना वाचविण्यात यश मिळाल्याचा दावा केला जातो. पण अद्याप ३० हून अधिक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक यंत्रणांनी स्पष्ट
केले.

leave a reply